मंगळवारी आढळले ११२ कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 05:00 AM2020-09-16T05:00:00+5:302020-09-16T05:00:09+5:30

कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याने आज ६१९ व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सध्या आयसोलेशन वॉर्डात ८१६ व्यक्ती आहेत. मंगळवारी ६४६ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोविड चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. मंगळवारी एकाच दिवशी ११२ व्यक्ती कोविड बाधित आढळल्याने जिल्ह्यातील कोविड बाधितांची संख्या २ हजार ७४१ झाली आहे.

112 corona infected found on Tuesday | मंगळवारी आढळले ११२ कोरोना बाधित

मंगळवारी आढळले ११२ कोरोना बाधित

Next
ठळक मुद्दे५६ व्यक्तींचा कोविडवर विजय : ६३० व्यक्तींचे प्राप्त झाले अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मंगळवारी ६३० व्यक्तींच्या कोविड चाचणीचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. त्यापैकी ११२ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रभावी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपम हिवलेकर यांनी केले आहे.
कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याने आज ६१९ व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सध्या आयसोलेशन वॉर्डात ८१६ व्यक्ती आहेत. मंगळवारी ६४६ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोविड चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. मंगळवारी एकाच दिवशी ११२ व्यक्ती कोविड बाधित आढळल्याने जिल्ह्यातील कोविड बाधितांची संख्या २ हजार ७४१ झाली आहे. तर मंगळवारी सात कोविड बाधितांनी उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतल्याने जिल्ह्याची कोविड मृतकांची संख्या ६१ झाली आहे. त्यापैकी एका व्यक्तीचा इतर आजाराने मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी मंगळवारी ५६ व्यक्तींनी कोविडवर विजय मिळविला आहे.

Web Title: 112 corona infected found on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.