शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

११ लाखांचा कर होणार वसूल

By admin | Updated: January 7, 2016 02:40 IST

शासनाने डिजिटलायजेशनवर भर देत सेट आॅफ बॉक्स लावणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील वर्धा शहरासह लगतची अकरा ...

दोघांवर दंडाची आकारणी : ७८ केबल आॅपरेटर्सला बजावली नोटीसप्रशांत हेलोंडे वर्धाशासनाने डिजिटलायजेशनवर भर देत सेट आॅफ बॉक्स लावणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील वर्धा शहरासह लगतची अकरा गावे, आर्वी, सिंदी (रेल्वे), पुलगाव, देवळी व हिंगणघाट या शहरांमध्ये सेट टॉप बॉक्स बंधनकारक करण्यात आले आहे. तत्पूर्वी केबल जोडणीची खरी ग्राहक संख्या समोर यावी म्हणून तत्पूर्वी प्रशासनाकडून ‘रॅन्डम’ सर्वेक्षण करण्यात आले. यात ३ हजारांवर अतिरिक्त ग्राहक आढळून आले आहेत. यात दोषी केबल आॅपरेटरकडून ११ लाख रुपयांचा करमणूक कर वसूल करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात विविध केबल नेटवर्कचे सुमारे २४७ केबल आॅपरेटर आहेत. या आॅपरेटरकडे प्रचंड ग्राहक संख्या असताना केवळ ४६ हजार ग्राहकांकडेच केबल जोडण्या असल्याचे सांगण्यात येत होते. केवळ तेवढ्याच ग्राहकांच्या करमणूक कराचा भरणाही केला जात होता. यामुळे शासनाच्या आदेशावरून प्रशासनाने जिल्ह्यात रॅन्डम सर्वेक्षण केले. हा सर्व्हे करीत असताना ८ हजार ९२७ ग्राहक असल्याचे सांगण्यात आले होते; पण प्रत्यक्ष सर्वेक्षणात ११ हजार ९८६ केबल ग्राहक आढळून आले. यातील अतिरिक्त ३ हजार ५९ ग्राहकांकडील मनोरंजन कर केबल आॅपरेटरकडून भरण्यातच आला नाही. असाच प्रकार संपूर्ण जिल्ह्यात रॅन्डम सर्वेक्षणात आढळून आला आहे. जिल्ह्यातील एकूण ७८ केबल आॅपरेटर्सनी सुमारे ११ लाख रुपयांचा कर बुडविला असल्याचेही सर्वेक्षणात समोर आल्याची माहिती देण्यात आली. यामुळे त्यांच्याकडून तो वसूल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.तुर्तास संजय शुक्ला आणि रितेश कांबळे या केबल आॅपरेटरवर दंडाची आकारणी करण्यात आली आहे. यात शुल्का यांच्याकडून ७५ हजार रुपये तर कांबळे यांच्याकडून ५० हजार रुपयांची वसुली करण्यात येणार असल्याची माहितीही करमणूक कर विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.सेट आॅफ बॉक्सबाबत शासनाचा कुठलाही हस्तक्षेप नाही. शासनाकडून ते उपलब्धही करून देण्यात आलेले नाहीत वा ग्राहकांकडून किती पैसे घ्यावे, याबाबतही स्पष्ट सूचना नाहीत. शिवाय प्रती महिना ग्राहकांकडून केबल जोडणीपोटी किती रुपये घ्यावेत, याबाबतही निर्देश नाहीत. परिणामी, यात ग्राहकांचीच मोठी लूट होणार असल्याची ओरडही होत आहे. केबल आॅपरेटरर्सकडून मोठ्या प्रमाणात करमणूक कराची चोरी केली जात असल्याचे सर्वेक्षणादरम्यान समोर आले आहे. सर्व्हेमध्ये तब्बल ३ हजार ग्राहक अतिरिक्त आढळून आले आहेत. यामुळे ७८ केबल आॅपरेटरला नोटीस पाठविण्यात आले असून दोघांवर दंड ठोठावण्यात आला आहे.- वैभव नावडकर, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.९० रुपये प्रती महिना खर्चकेबल आॅपरेटरला प्रत्येक ग्राहकांमागे ९० रुपये अदा करावे लागणार आहेत. यातील ६० रुपये केबल नेटवर्क कंपनीला तर ३० रुपये शासनाचा कर भरावा लागणार आहे. ग्राहकांकडून १५० रुपये प्रती महिना वसूल केल्यास केबल आॅपरेटरला ६० रुपये प्रती ग्राहक मिळकत राहणार आहे; पण एवढ्यात ‘मेन्टनन्स’ होणार नसल्याची ओरड केबल आॅपरेटरकडून होताना दिसत आहे. यामुळे ग्राहकांवर केबल जोडणीचा सुमारे २०० ते २५० रुपये बोजा पडणार असल्याचेही बोलले जात आहे.