शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Top Marathi News LIVE Updates: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांनी १,७०८ शेतकऱ्यांचे केले नुकसान

By admin | Updated: May 1, 2017 00:38 IST

जंगल परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाहिजे त्या प्रमाणात खाद्य उपलब्ध नसल्याने ते सध्या मानवीवस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.

चार महिन्यांत चार इसमांसह ५४ जनावरे केले जखमी वर्धा : जंगल परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाहिजे त्या प्रमाणात खाद्य उपलब्ध नसल्याने ते सध्या मानवीवस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. गत चार महिन्यांत वन्यप्राण्यांनी चक्क १ हजार ७०८ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले. तर चार इसमांसह ५४ जनावरांना जखमी केल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे. जखमीच्या कुटुंबियांना व नुकसानग्रस्त बहुतांश पशुपालक तसेच शेतकऱ्यांना वनविभागाच्यावतीने शासकीय मदत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. बऱ्याचदा वन्यप्राणी शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करतात. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. जंगली श्वापदांच्या हल्ल्यात जनावरे दगावत असून अनेकदा जनावरे जखमीही होतात. वन्यप्राण्यांकडून शेतपिकाचे होणारे नुकसान, जनावरे जखमी केल्यास तसेच जनावरे मारली गेल्यास संबंधीतांना वनविभागाच्यावतीने शासकीय मदत दिली जाते. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील आर्वी वनपरिक्षेत्रात २५७ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे, आष्टी(श.) वनपरिक्षेत्रात १९३, कारंजा(घा.)त ७१०, समुद्रपूर १६३, हिंगणी १९१, तळेगाव ५०७, खरांगणा १३६ व वर्धा वनपरिक्षेत्रातील ११५५ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले. सदर शेतकऱ्यांना मार्च अखेरपर्यंत एकूण १ कोटी ९० लाख ८३ हजार ४८७ रुपयांची शासकीय मदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याच कालावधीत वन्यप्राण्यांनी ३२ मनुष्यांना जखमी केले. सदर जखमींच्या कुटुंबियांना एकूण १९ लाख २५ हजार ७९१ रुपयांची शासकीय मदत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. दिवसेंदिवस वन्यप्राणी शेतशिवारांमध्ये येत धुमाकुळ घालत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने योग्य पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी) हिंगणी क्षेत्रात जनावरांवर सर्वाधिक हल्ले एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील आर्वी १८, आष्टी(श.) ४, कारंजा(घा.) १७, समुद्रपूर ७, हिंगणी ४७, तळेगाव १४, खरांगणा २० व वर्धा वनपरिक्षेत्रात ३ जनांवरांना वन्यप्राण्यांनी जखमी केले. सदर नुकसानग्रस्त पशुपालकांना मार्च अखेरपर्यंत ७ लाख ९५ हजार ९०० रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.