उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली, जिथे एका महिलेने प्रियकर पुतण्यासोबत मिळून पतीची हत्या केली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कॉल डिटेल्सवरून हा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या पुतण्यालाही अटक केली आहे. याप्रकणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ही घटना साध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मण खेडा येथे घडली, जिथे १० मे २०२४ रोजी घराबाहेर झोपलेल्या धर्मेंद्र नावाच्या हत्या करण्यात आली. पोलीस तपासात मृत व्यक्तीची पत्नीने पुतण्यासोबत मिळून ही हत्या केल्याची उघड झाले. मृताची पत्नी रीना आणि पुतण्या सतीश यांच्यात अनैतिक संबंध होते, याची धर्मेंद्र कुणकुण लागली होती. त्यानंतर रीनाने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या धर्मेंद्रचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. घटनेच्या दिवशी धर्मेंद्र घराबाहेर एका खाटेवर झोपलेला असताना रीना आणि सतीशने त्याची हत्या केली.
त्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीविरोधात स्थानिक पोलीस ठाण्याचा हत्येचा गुन्हा दाखल केला. परंतु, पोलिसांना त्यांच्यावर वेगळाच संशय आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे कॉल डिटेल्स तपासले असता हत्येचे कारण समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी अनेक दिवसांपासून धर्मेंद्रच्या हत्येचा कट रचत होते. परंतु, सतीशने त्याच्या काकाची हत्या करण्यास नकार दिला. त्यामुळे रीनाने स्वतःच घराबाहेर झोपलेल्या धर्मेंद्रच्या डोक्यात दांडक्याने वार केले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या हत्येत सतीशने रीनाची मदत केली.