शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:16 IST

"राजदच्या १५ वर्षांच्या राजवटीत ६० हून अधि नरसंहार, ३० हजारहून अधिक अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. बिहारमध्ये काँग्रेस आणि राजद जोडी जंगलराज घेऊन आली होती."

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एनडीए उमेदवारांसाठी अररियातील सिकटी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. येथे भाजपाने आमदार विजयकुमार मंडल यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी त्यांना पुन्हा एकदा विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला केले.

आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस, राजद आणि महागठबंधनावर बिहारमध्ये “जंगलराज” आणल्याचा आरोप केला. योगी म्हणाले, गौरवशाली इतिहास असलेल्या बिहारसमोर संकटे निर्माण करणारेच खरे अपराधी आहेत. ज्यांनी राज्य मागे ढकलले. नागरिकांसमोर ओळखीचे संकट निर्माण केले. आता हे लोक, मोठ-मोठ्या घोषणा करत आहेत आणि नोकरीच्या नावावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ज्यांचा भूतकाळ कलंकित आणि काळा आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. 

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, काँग्रेस आणि राजदच्या काळात बिहारसमोर साक्षरतेचे संकटही उभे होते. मात्र २००५ मध्ये जेव्हा नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार आले, तेव्हा बिहारने प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. सिव्हिल सर्व्हंट, आयएएस, आयपीएस, आयएफएस, स्टार्टअप, उद्योजक आदी अनेक क्षेत्रांत काही तरी नवे करत, देश आणि जगासाठी मॉडेल तयार करत आहेत. बिहारच्या विकासाची ही यात्रा थांबूनये. विरोधकांवर टीका करताना योगी म्हणाले, “काँग्रेस आणि राजदची जोडी म्हणजे विकासाला 'जंगलराज'मध्ये बदलणारी जोडी आहे.” राजदच्या १५ वर्षांच्या राजवटीत ६० हून अधि नरसंहार, ३० हजारहून अधिक अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. बिहारमध्ये काँग्रेस आणि राजद जोडी जंगलराज घेऊन आली होती. यांच्या शासन काळात व्यापारी, इंजिनिअर, डॉक्टर, मुले आणि मुलीही सुरक्षित नव्हत्या. 

दरम्यान योगी यांनी राममंदिराचाही उल्लेख केला. ते म्हणाले, काँग्रेस-राजद हे “रामद्रोही” आहेत, तर मोदीजींच्या नेतृत्वात आस्थेचा सन्मान, विकास आणि गरीब कल्याण यांसाठी कार्य केले गेले. केंद्र सरकारच्या योजनांमुळे काँग्रेस-राजदची दलाली संपुष्टात आली आहे. आता पैसे थेट लाभारऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. यावेळी, बिहारमध्ये पुन्हा जंगलराज येऊ द्यायचे नाही, असे आवाहनही त्यांनी जनतेला गेले.

English
हिंदी सारांश
Web Title : Yogi Slams Congress-RJD Alliance: Untrustworthy Due to Tainted Past

Web Summary : Yogi Adityanath criticized the Congress-RJD alliance in Bihar, accusing them of a tainted past and promoting 'Jungle Raj'. He highlighted NDA's development under Nitish Kumar and warned against returning to an era of lawlessness and corruption, emphasizing the importance of continued progress and security.
टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५