शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

खासदारालाच चुना लावला! कर्ज उचललेली जमीन १.६० कोटींना विकली; वर करही न भरलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:47 IST

बहुतांश ठिकाणी भूमाफियांवर राजकारण्यांचा वरदहस्त असतो, अनेक ठिकाणी राजकारणीच भूमाफिया असतात.

जमीन विक्रीच्या व्यवहारात खासदार महोदयांनाच चुना लावण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी भूमाफियांवर राजकारण्यांचा वरदहस्त असतो, अनेक ठिकाणी राजकारणीच भूमाफिया असतात. परंतू, खासदारालाच दीड कोटींना चुना लावण्यात आल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. 

प्रतापगढचे सपाचे खासदार आणि लखनऊ पब्लिक स्कूलचे व्यवस्थापक डॉ. एसपी सिंह यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी जमीन आणि दोन दुकाने अशी मालमत्ता आनंद नगरच्या भूमिका कक्कड यांच्याकडून घेतली होती. खरेदीखतही केले गेले. परंतू, जेव्हा ताबा घेतला तेव्हा त्यांना या मालमत्तेवर बँकेचे कर्ज असल्याचे समोर आले. एवढेच नाही तर या मालमत्तेचा करही थकीत असल्याचे समोर आले. 

यामुळे सिंह यांनी आलमबाग पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. आनंद नगरमध्ये शाळेची शाखा आहे. या शाळेच्या बाजुची जमीन शाळेच्या कामासाठी हवी होती. भूमिका कक्कर आणि तिचे काका विनोद कुमार यांची ती जागा होती. भूमिका आणि तिची बहीण शिल्पी यांची दुकाने या जमिनीवर बांधण्यात आली होती. जमीन आणि दुकाने याचा व्यवहार २.८० कोटी रुपयांना झाला. यापैकी १.६० कोटी रुपये भूमिकाला मिळाले होते. दोन्ही दुकाने रिकामी करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. भुमिकाच्या वाट्याच्या जमिनीवर महापालिकेचा २४ हजार रुपयांचा कर थकीत असल्याचे समजले. तसेच यामुळे ही जागा महापालिकेने सील केली होती. 

२४ हजार छोटी रक्कम असल्याने सिंह यांनी ती पालिकेत भरली होती. परंतू कर भरल्यानंतर या जमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे २०१९ मध्ये लाखोंचे कर्ज घेतल्याचे समोर आले. भूमिकाने कर्जाचा हप्ता न भरल्याने बँक कर्मचारी तिथे आले होते. आता हे कर्ज असल्याने बँकेच्या परवानगीशिवाय ही जागा विकता येत नाही, तरीही खरेदीखत झाले होते. यामुळे फसवणूक झाल्याचे समजताच सिंह यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजी