शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउन मध्ये घरचे सगळे चिडचिड का करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 08:00 IST

मला खूप कंटाळा आलाय आता घरात बसून. कधी संपणार हे सगळं?

ठळक मुद्देया कंटाळ्याला कसं पळवून लावता येईल याच्या युक्ती शोधा. 

आता लॉक डाऊन आणखी वाढलाय.  मला खूप कंटाळा येतो घरात. आईबाबाही अधून मधून एकमेकांवर चिडचिड करतात. त्यांनाही कंटाळा येत असेलच. मलाही खूप भांडावंसं वाटतं असं का होत असेल? - अनिता शिरमळकर,  मुंबई 

अनिता आपली सगळ्यांची आता मोठी परीक्षा आहे बरंका ! बघ म्हणजे तुलाच काय कुणालाच असं सतत, 24/7 घरात बसायची सवय नाहीये. आईबाबा ऑफिसला जातात, तू शाळेत, क्लासेसना.आपण सगळेच आपल्या रुटीनमध्ये बिझी असतो, पण आता एकदम सगळ्यांचीच रुटीन्स बंद झाली आहेत आणि सगळेच घरात अडकले आहेत. त्यामुळे आता पुढचे सगळे लॉकडाऊनचे दिवस झाल्यावर कंटाळा येणं स्वाभाविक आहे. परिस्थितीच अशी आली आहे कि सगळ्यांचीच थोडी थोडी चिडचिड होतेय. पण विश्वास ठेव हाही काळ निघून जाईल. आपण घरात थांबलो तर कोरोना विषाणूला य युद्धात नक्की हरवू. 

आता आलेल्या कंटाळ्याचं करायचं काय? 1. तुला चित्र काढून, पुस्तकं वाचून कंटाळा आला असेल तर थोडे दिवस हे काहीच करू नकोस. 2. वेगळं काहीतरी कर. गाणी ऐक, युट्युबवर भाषा, नाच शिक. कुकिंग शिक. 3. मग याचाही कंटाळा आला कि परत चित्र काढ. किंवा एखाद दिवशी काहीच न करता मस्त झोपा काढ. 4. आपण सतत घरात आहोत, बाहेर जाता येत नाही या विचारानेही दमायला होतं. अगदी आईबाबांना सुद्धा. 5. मग अशावेळी आपल्याला ज्या गोष्टींचा कंटाळा आलाय, त्या न करता काहीतरी वेगळंच करायचं. म्हणजे मग कंटाळा दूर पळून जातो. कारण कंटाळ्याला पळवून लावण्या व्यक्तिरिक्त आता तरी आपल्याकडे दुसरा काहीच उपाय नाहीये. 6. घराबाहेर तर पडता येणार नाही, मग उगाच एकमेकांच्या अंगावर चिडचिड करण्यापेक्षा तू एक काम कर, आईबाबांना ही बरोबर घे आणि तुम्ही सगळे मिळून या कंटाळ्याला कसं पळवून लावता येईल याच्या युक्ती शोधा. 7.मला खात्री आहे तुम्ही सगळे एकत्र आलात कि तुम्हाला युक्ती सापडेल आणि तुमचा वेळ नक्की छान जाईल आणि चिडचिड कमी होईल. 

अनिताचा हा प्रश्न वाचणाऱ्या  सगळ्या मित्र मैत्रिणींनीही आईबाबांना एकत्र घेऊन टीम करा आणि कंटाळ्याला पळवून लावा. त्यासाठी तुम्ही काय काय युक्ती केलीत ते उर्जाला नक्की कळवा. .