शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही कधी रंग वितळवले आहेत? - हे काय भलतंच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 11:51 IST

पण त्यासाठी घरातल्या मोठ्यांची थोडी मदत लागेल, ती घ्यायला विसरू नका!

ठळक मुद्देचला, रंग वितळवू या.

तुम्ही कधी रंग वितळवले आहेत? आता तुम्हाला प्रश्न पडेल हे काय भलतंच. रंग कोणी वितळवत का? पण तुम्हाला माहिते रंग वितळवून सुद्धा एक सुंदर चित्र तयार होऊ शकतं. कसं? चला बघूया!साहित्य: निरनिराळ्या रंगांचे क्रेयॉन्स, हातात धरता येईल अशी छोटी किसणी, पांढरा कागद, बटर पेपर जो बेकरी पदार्थ करायला वापरतात. समजा तो नसेल तर शाळेच्या वह्यांच्या कव्हर्ससाठी वापरला जाणारा प्लॅस्टिक कोटेड कागद. जुन्या वह्यांची कव्हर्स काढून वापरू शकता. तेही नसेल तर दुसरा पांढरा कोरा कागद वापरा. इस्त्री (मोठ्यांची परवानगी आणि गरज असल्यास मार्गदर्शन आवश्यक.), वर्तमानपत्र कृती :

1) वर्तमानपत्र पसरून घ्या. त्यावर पांढरा कागद ठेवा. 2) आता किसणी हातात घेऊन तुम्हाला जे जे रंग हवे आहेत ते आलटून पालटून पांढऱ्या  कागदावर किसा. रंगांचा किस पांढऱ्या  कागदावर पडायला हवा. 3) समजा आजूबाजूच्या वर्तमानपत्रवर सांडला तर तो उचलून  कागदावर टाका. 4) इस्त्री गरम करा. रंग किसून टाकलेल्या पांढऱ्या  कागदावर बटर पेपर किंवा पर्यार्यी कागद ठेवा.5) आणि कागद जळणार नाही याची काळजी घेत वरच्या बटर पेपरवरून इस्त्री फिरवा. 6) इस्त्री खूप तापवू नका. नाहीतर कागद जळेल. 7) इस्त्री फिरवताना खालचे रंग मेल्ट होऊन कागदावर पसरतील आणि आकृती तयार करतील. 8) पुरेशी इस्त्री फिरवून झाली कि इस्त्री बंद करून लांब सुरक्षित जागी ठेवा. 9) वरचा बटर पेपर किंवा कागद हलक्या हाताने काढा. 10) सुंदर पेंटिंग तयार झालेलं कागद तयार आहे. 11) या वितळलेल्या क्रेयॉन्सपासून तयार झालेल्या कागदाचा वापर तुम्ही निरनिराळी पद्धतीने करु शकता. हा कागद आतून कोराच आहे त्यामुळे त्याचा ग्रीटिंग कार्ड सारखा उपयोग होऊ शकतो. किंवा क्रेयॉन्सचा भाग वर ठेवून या कागदापासून तुम्ही इन्व्हॉलॉप्स बनवू शकता. 12) टेक्श्चर्ड् पेपर आणण्याला बाजारात जायला नको कि पैसे खर्च करायला नको. घरच्या घरी तुम्ही सुंदर नक्षीदार कागद तयार करू शकता.