शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

कानातले घरभर फिरतात ? मग त्यांच्यासाठी बनवा मस्त होल्डर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 17:11 IST

हे मुलींच्या उपयोगाचं आहे, पण मुलगेही बनवू शकतातच की!

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

निरनिराळ्या प्रकारचे खूप सारे कानातले मुलींकडे असतात. लटकन, टॉप्स आणि काय काय. एकाच डबीत  सगळे ठेवले तर आयत्या वेळी एकतर सापडत नाहीत किंवा एकमेकांत जाम गुंतून बसतात. आता तुम्ही बसल्या बसल्या कानातल्यांसाठी मस्त स्टॅन्ड बनवू शकता. साहित्य: कार्ड बोर्ड किंवा जाड पुठ्ठा, पेन्सिल, पट्टी, कर्कटक , रंग कृती:1) तुमच्याकडे किती कानातल्यांचे जोड आहेत ते मोजा. 2) त्या अनुषंगाने कार्डशीट किंवा पुठ्ठ्याचा तुकडा घ्या. 3) एकावेळी ए फोर आकाराच्या कागदापेक्षा मोठा नको, किंवा त्याहीपेक्षा लहान चालू शकेल. 4) आता एक सेंटिमीटरवर उभ्या आणि आडव्या रेषा मारून घ्या. 5) प्रत्येक एक सेंटिमीटरवर जिथे उभ्या आणि आडव्या रेषा एकमेकांना छेदतात तिथे पेन्सिलने डार्क टिम्ब काढा.6) आणि कर्कटकने त्यावर छिद्र पाडा. हे छिद्र कानातल्याची काडी जाईल इतपत असायला हवं. 

7) आता कार्डशीट/पुठ्ठा तुमचा हवा त्या पद्धतीने, डिझाईनने रंगवा. 8) त्याला एकतर स्टॅन्ड करा किंवा पुठ्ठ्याच्या वरच्या बाजूला दोन्ही टोकांना मोठी छिद्र पडून त्यातून सुतळी ओवून हे टॉप्स होल्डर तुम्ही लटकवू शकता. 9) किंवा या पुठ्ठ्याच्या मागच्या बाजूने चारही बाजूंनी डबल टेप लावा. डबल टेपचे दोन स्तर लावा आणि मग हा होल्डर तुमच्या कपाटाच्या आतल्या बाजूने चिकटवून टाका. 10) रंग वाळल्यावर प्रत्येक दोन शेजारच्या छोट्या छिद्रामध्ये तुमची कानातली लटकवा.