शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

ताठ मानेनेच कशाला , ताठ पाठीनेही जगू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 13:16 IST

द्या पाठीला ताण! बघा, तुम्हाला एकदम कसं मस्त वाटायला लागेल ते!!!

ठळक मुद्देकरा हा व्यायाम, म्हणजे कोणाला पाठ दाखवायची वेळ तुमच्यावर येणार नाही!

तुमच्यापैकी अनेकांना तुमच्या शिक्षकांनी, नाहीतर तुमच्या पालकांनी अनेकदा सांगितलं असेल, ताठ उभं राहा. असे लुळ्यापाळ्यासारखे का उभे राहता म्हणून.म्हणजे फक्त उभे असतानाच नाही, अनेकांना तर बसलेले असतानाही पाठीचा गोळा करुन बसायची सवय असते. पण ही सवयच नंतर आपल्याला घातक ठरते. अनेकांना पाठीचा त्रस सुरू होतो. थोडा वेळ बसलं तरी पाठ दुखायला लागते. पण हे टाळायचं असेल तर पाठीचे व्यायाम करायलाच हवेत. अनेकदा लहान मुलांचीही पाठ दुखते. कारण एकतर पाठीत ताकद नसते, लवचिकता नसते आणि बसण्याची, उभं राहण्याची पद्धत चुकीची असते.पण आज मी तुम्हाला एक व्यायाम सांगणार आहे. पाठीसाठी हा व्यायाम खूपच चांगला आहे. त्यामुळे तुमची उठण्या-बसण्याची पद्धत तर सुधारेलच, पण पाठीचा त्रस होण्याची शक्यताही खूपच कमी होईल. अनेकांना लोअर बॅकचा त्रस होतो, म्हणजे पाठीच्या खालच्या भागात दुखतं. त्यासाठीचा व्यायाम आहे ‘लोअर बॅक रोटेशनल स्ट्रेचेस’!भारी वाटतं ना हे नाव ऐकायलासुद्धा? आणि ते कठीण असेल असंही वाटतं.पण हा व्यायाम तुलनेनं सोपा आहे.आपण काही वेळा जसं डोक्याला ताण देतो, तसं पाठीला ताण द्यायचा फक्त. बसल्या बसल्यासुद्धा हा व्यायाम करता येतो, पण त्याची पद्धत मी तुम्हाला नंतर सांगेन.कसा कराल हा व्यायाम?1- जमिनीवर अंथरायला एखादी सतरंजी नाहीतर मॅट घ्या. सरळ त्यावर झोपून घ्या.2- आता दोन्ही हात जमिनीला समांतर पसरा.3- आपले दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा. 4- हात जमिनीला टेकलेले असतानाच आपले दोन्ही पाय कंबरेपासून फिरवून जमिनीच्या एका बाजूला टेकवा.5- पाच सेकंद त्याच अवस्थेत राहा.6- लक्षात ठेवा, हात मात्र उचलायचे नाहीत, ते वाकडेतिकडे होऊ द्यायचे नाहीत.7- आता असंच दुस:या बाजूनंही करा. 

काय होईल या व्यायामामुळे?

1- पाठीचा, विशेषत: पाठीच्या खालच्या भागाला व्यायाम मिळेल.2- लवचिकता वाढेल.3- पाठ मजबूत होईल. 4- चपळता आणि स्फूर्ती वाढेल.करा हा व्यायाम, म्हणजे कोणाला पाठ दाखवायची वेळ तुमच्यावर येणार नाही!- तुमचीच एक्सरसाइज फ्रेंड, ऊर्जा