कोणत्या देशातील लोक जगभरात सगळ्यात जास्त फिरतात, भारत 'या' यादीत कोणत्या नंबरवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 16:20 IST2026-05-01T16:18:31+5:302026-05-01T16:20:10+5:30

Travel : जगातील सगळ्यात जास्त पर्यटन करणारे देश कोणते आणि येथील लोक एका वर्षात किती प्रवास करतात, तसेच भारत या यादीत कोणत्या स्थानावर आहे.

Which nation tops global tourism list and where India stands in this list | कोणत्या देशातील लोक जगभरात सगळ्यात जास्त फिरतात, भारत 'या' यादीत कोणत्या नंबरवर?

कोणत्या देशातील लोक जगभरात सगळ्यात जास्त फिरतात, भारत 'या' यादीत कोणत्या नंबरवर?

Travel : प्रवास करायची, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्याची आवड अनेकांना असते. आपणही अनेक देशात अनेक ठिकाणी किंवा परदेशातही फिरायला गेले असालच. पण आपल्याला माहीत आहे का की, जागतिक पर्यटनाच्या शर्यतील कोणता देश सगळ्यात पुढे आहे? म्हणजे कोणत्या देशातील लोक सगळ्यात जास्त पर्यटन करतात. संयुक्त राष्ट्र विश्व पर्यटन संघटना आणि स्टेटिस्टाची याबाबत माहिती देणारी आकडेवारी समोर आलीये. पाहुयात जगातील सगळ्यात जास्त पर्यटन करणारे देश कोणते आणि येथील लोक एका वर्षात किती प्रवास करतात, तसेच भारत या यादीत कोणत्या स्थानावर आहे.

कुठले लोक खूप जास्त फिरतात?

जर्मनीतील लोक सगळ्यात जास्त पर्यटन करतात. आकडेवारीनुसार, सगळ्यात जास्त परदेश प्रवास करणाऱ्यांच्या यादीत जर्मनी पहिल्या क्रमांकावर आहे. जर्मनीतील नागरिकांनी एका वर्षात जवळपास २१.९ कोटी आंतरराष्ट्रीय प्रवास केले. येथील लोकांना फिरायची खूप आवड आहे. यामागे येथील मजबूत अर्थव्यवस्था, नागरिकांचं जास्त उत्पन्न आणि वर्षभरात मिळणाऱ्या पुरेशा सुट्टी आहे. त्याशिवाय यूरोपच्या केंद्रात असल्याने शेजारच्या देशांमध्ये प्रवास करणं फार सोपं आणि स्वस्त ठरतं. 

दुसरा नंबर अमेरिका

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचा नंबर लागतो. अमेरिकन नागरिकांना एका वर्षात साधारण १६.४ कोटी आंतरराष्ट्रीय प्रवास केले. अमेरिकेतही लोकांना भरपूर पगार मिळतो आणि येथील चांगल्या विमान सेवेमुळे येथील लोकांना परदेशात फिरायला जायला आवडतं. अमेरिकेचा पासपोर्ट फार प्रभावी असल्याने लोक जगात कुठेही सहजपणे प्रवास करू शकतात. 

चीनही बराच पुढे

चीन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. येथील लोकांनी एका वर्षात १०.४० कोटी परदेशवाऱ्या केल्या. कोरोनानंतर येथील लोक मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी बाहेर पडत आहे. वाढती अर्थव्यवस्था आणि मध्यम वर्गाच्या वाढत्या संख्येने चीनला जगात सगळ्यात महत्वाच्या ट्र्रॅव्हल मार्केटपैकी एक बनवलं आहे.

तर चौथ्या नंबरवर यूनायटेड किंगडमचं नाव येतं. ब्रिटनमधील लोकांनी एका वर्षात जवळपास ९.१० कोटी परदेशवाऱ्या केल्या. येथील लोकांना ऐतिहासिक स्थळं आणि समुद्र किनाऱ्या सुट्टी एन्जॉय करणं फार आवडतं. हे लोक वेगवेगळ्या देशात फिरायला जातात.  

भारताची स्थिती काय?

आता पाहुयात भारताची या यादीत कोणती जागा आहे. तर भारत पर्यटनाच्या बाबतीत उगवता तारा असल्यासारखा समोर येतोय. आकडेवारीनुसार, भारतीय लोकांनी एका वर्षात साधारण ३.१७ कोटी परदेशवाऱ्या केल्या. ही संख्या जर्मनी आणि अमेरिकेपेक्षा बरीच कमी असली तरी भारताचा विकास दर वाढता आहे. देशात मध्यम वर्गाचा विस्तार, वाढतं उत्पन्न आणि स्वस्त विमान प्रवासाने भारतीय परदेशात फिरायला जाण्यास प्राधान्य देतात. 

Web Title : शीर्ष यात्रा करने वाले राष्ट्र: किस देश के नागरिक सबसे अधिक यात्रा करते हैं?

Web Summary : जर्मनी अंतर्राष्ट्रीय यात्रा में सबसे आगे है, जिसके बाद अमेरिका और चीन हैं। भारतीयों ने 3.17 करोड़ विदेश यात्राएँ कीं, जो आर्थिक विकास और सस्ती उड़ानों के कारण बढ़ रही है।

Web Title : Top Traveling Nations: Which Country's Citizens Travel the Most?

Web Summary : Germany leads in international travel, followed by the USA and China. Indians made 3.17 crore trips abroad, a rising number due to economic growth and affordable flights.