राम मंदिर-बाबरी मशिदीच्या जमिनीच्या मालकीच्या वादावर जानेवारीमध्ये सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर भाजपा, रा.स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषद, तसेच संत-महंतांनी मंदिर लवकर व्हावे, यासाठी मोदी सरकारवर दबाव आणायला सुरुवात केली आहे. ...
भाजपाला राम मंदिर बांधायला जमत नसेल तर आम्ही अयोध्येत राम मंदिर बांधू, असे आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या दिवशी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. ...
धर्मवेडाने आंधळेपण आलेली माणसे सर्वधर्मसमभाव व देशप्रेम याहून परधर्मद्वेषाचे राजकारणच अधिक करतात. मग अकबराने अलाहाबाद उभारले तेव्हा त्याने इस्लामचा त्याग केला होता याचेही स्मरण करावेसे त्यांना वाटत नाही. ...