वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
अखेरीस तोडगा निघाला नसल्याने एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकूणच काँग्रेसप्रमाणेच एमआयएमला देखील वंचितमध्ये दुय्यम स्थान मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. ...
लक्ष्मण माने यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितले. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आघाडीसोबत आल्यास आपण आपला पक्ष वंचितमध्ये विलीन करू असं माने यांनी म्हटले. त्याचवेळी त्यांनी आपल्याला शिवसेनेचे वावडे नसून प्रबोधनकार ठाकरे आपले गुरू असल्याचे ...