लक्ष्मण मानेंनी सुचवला ईव्हीएम यंत्रणेला अडचणीत आणण्याचा अजब पर्याय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 02:31 PM2019-09-09T14:31:50+5:302019-09-09T14:36:04+5:30

लक्ष्मण माने यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितले. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आघाडीसोबत आल्यास आपण आपला पक्ष वंचितमध्ये विलीन करू असं माने यांनी म्हटले. त्याचवेळी त्यांनी आपल्याला शिवसेनेचे वावडे नसून प्रबोधनकार ठाकरे आपले गुरू असल्याचे सांगितले.

Laxman Mane suggests alternative option to EVM | लक्ष्मण मानेंनी सुचवला ईव्हीएम यंत्रणेला अडचणीत आणण्याचा अजब पर्याय !

लक्ष्मण मानेंनी सुचवला ईव्हीएम यंत्रणेला अडचणीत आणण्याचा अजब पर्याय !

Next

मुंबई - वंचित बहुजन आघाडीला सोडून स्वत:ची महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी स्थापन करणारे माजी आमदार लक्ष्मण माने यांनी भाजप म्हणजे ईव्हीएमचं सरकार असल्याची टीका केली. तसेच ईव्हीएमला अडचणीत आणण्याचा अजब पर्याय माने यांनी सुचवला आहे.

भारतीय जनता पक्षाला ईव्हीएमच्या जोरावर सत्ता मिळाली आहे. ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असून आपला ईव्हीएमला विरोध आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घेतल्यास, निकाल वेगळा राहिल, असा दावाही माने यांनी केला. सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माने यांनी आरएसएसवर देखील टीका केली.

देशाचा कारभार आरएसएसच्या माध्यमातूनच सुरू आहे. आरएसएसकडे आता मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे. त्यामुळे भाजपला पराभूत करणे आता शक्य नाही. त्यामुळे ईव्हीएम हटविणे एकमेव पर्याय आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी ईव्हीएम मतदान प्रक्रियेला अडचणीत आणणे एक पर्याय होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक मतदार संघात १५० ते २०० हून अधिक उमेदवार उभे करावे, असा सल्ला माने यांनी दिला.

दरम्यान माने यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितले. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आघाडीसोबत आल्यास आपण आपला पक्ष वंचितमध्ये विलीन करू असं माने यांनी म्हटले. त्याचवेळी त्यांनी आपल्याला शिवसेनेचे वावडे नसून प्रबोधनकार ठाकरे आपले गुरू असल्याचे सांगितले.

Web Title: Laxman Mane suggests alternative option to EVM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.