भाजपा मागासवर्गीयांची विरोधक आहे, असा गैरसमज सातत्याने पसरविला जात आहे, मात्र भाजपा मागासवर्गीय विरोधी नाही, अशी ग्वाही भाजपाच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विनोद सोनकर यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...
महाराष्ट्र सरकारने गेल्या दीड वर्षांत मागासवगीर्यांच्या ४० हजार कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रातच याचा उल्लेख केल्याची माहिती स्वतंत्र्य मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील यांनी दिली. ...
धनगर समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळावे, यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्य सरकारने एसटीचे आरक्षण लागू करण्याची मागणी धनगर समाजाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...
नाभिक समाजाला कोणत्याही सवलती नाहीत. समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करून विविध सवलतींचा लाभ देण्याची मागणी १९७० पासून शासन दरबारी रेटण्यात येत आहे. सवलती नसल्यामुळे समाजातील मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे नोकऱ्यातही त्यांचे प्रमाण ०.२ टक्के आहे. ...