Maharashtra Assembly Election 2019 : भाजपा मागासवर्गीयविरोधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:47 AM2019-10-17T00:47:51+5:302019-10-17T00:50:25+5:30

भाजपा मागासवर्गीयांची विरोधक आहे, असा गैरसमज सातत्याने पसरविला जात आहे, मात्र भाजपा मागासवर्गीय विरोधी नाही, अशी ग्वाही भाजपाच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विनोद सोनकर यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

Maharashtra Assembly Election 2019: BJP is not against backward classes | Maharashtra Assembly Election 2019 : भाजपा मागासवर्गीयविरोधी नाही

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपा मागासवर्गीयविरोधी नाही

Next
ठळक मुद्देविनोद सोनकर यांची स्पष्टोक्ती

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : अनुसूचित जाती, जमातीच्या महापुरुषांचा जेवढा सन्मान भाजपाने केला तेवढा कोणत्याच पक्षाने केला नाही. भाजपानेच एससी, एसटी, ओबीसीच्या प्रतिनिधींना सर्वाधिक संधी दिली आहे. तरीही भाजपा मागासवर्गीयांची विरोधक आहे, असा गैरसमज सातत्याने पसरविला जात आहे, मात्र भाजपा मागासवर्गीय विरोधी नाही, अशी ग्वाही भाजपाच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विनोद सोनकर यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण भाजप सरकारचे आहे. त्यामुळेच महु येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तसेच इंदू मिलची जागा मिळविण्याचे काम भाजपाने केले. दीक्षाभूमी येथे आजवर कॉंग्रेसचा एकही नेता आला नाही परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अटलबिहारी वाजपेयी यांनी येथे येउन नमन केले. समाजातील तरुणांच्या रोजगारासाठी अनेक योजना सरकारने आणल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे आदी उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: BJP is not against backward classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.