वेकोलिच्या कोळशाच्या खाणी असल्याने या मार्गावरून कोळसा वाहतूक करणारे अवजड ट्रक सतत धावत असतात. या मार्गाची अवजड वाहतूक सोसण्याची क्षमता नाही. त्यामुळे या मार्गावर हजारो खड्डे पडून रस्त्याची जणू चाळणी झाली आहे. ...
वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता उखडलेला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्त्यावरील खड्डे त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
चंद्रपूर आगाराची मुकुटबन बस मागील अनेक वर्षांपासून घुग्घूस, नकोडा, शिंदोला मार्गे जाते. मात्र मागील काही दिवसांपासून ही बस रस्ता खराब असल्याचे कारण देवून नायगाव, चारगाव चौकी मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे शिंदोला, नकोडा, मुंगोली येथील विद्यार्थ्य ...
धानोरा तालुक्यात १३ व १४ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे सोडे ते मोहलीपर्यंतचा मार्ग अतिशय खराब झाला आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला या मार्गाचे खोदकाम करून मुरूम व गिट्टी टाकण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे सदर मुरूम व गिट्टी वाहून गेली. ...
शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
शहर व परिसरातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसह पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ आगामी गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी गणेश भक्तांतून केली जात आहे़ ...
या रस्त्याने पायदळ जाणे म्हणजे जीवघेणे ठरते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. राळेगाव तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या वाढोणाबाजार येथे जाणारा हा एकमेव रस्ता आहे. ...