परभणी : गंगाखेडमध्ये मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:39 AM2019-08-28T00:39:15+5:302019-08-28T00:40:02+5:30

शहर व परिसरातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसह पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ आगामी गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी गणेश भक्तांतून केली जात आहे़

Parbhani: The main road in Gangakhed is a ditch | परभणी : गंगाखेडमध्ये मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे

परभणी : गंगाखेडमध्ये मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): शहर व परिसरातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसह पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ आगामी गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी गणेश भक्तांतून केली जात आहे़
शहरातील अंतर्गत रस्त्यासह शहराबाहेर जाणाºया मुख्य मार्गावरील खड्ड्यांच्या रस्त्यावरून वाहने चालविताना कराव्या लागत असलेल्या कसरतीमुळे वाहनधारक व पादचारी चांगलेच त्रस्त झाले आहेत़ आगामी श्रीगणेशोत्सवापूर्वी विसर्जन मार्गावरील रस्त्यावर असलेले खड्डे बुजवून श्री गणेश मूर्तींचा प्रवास सुखकर करावा, अशी माफक अपेक्षा गणेश भक्तांतून केली जात आहे़
गंगाखेड शहरातील कोद्री रोड ते संत जनाबाई मंदिरमार्गे गोदातट, दत्त मंदिर ते बसस्थानक मार्गे दिलकश चौक, परळी नाका ते डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे बसस्थानक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर नगर ते तारुमोहल्ला, मराठा चित्रमंदिर, जुने पोस्ट कार्यालय, सराफ लेन, भगवती चौक, वेताळ गल्ली या शहरांतर्गतच्या प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्ते व विसर्जन मार्गावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत़ त्याचबरोबर गंगाखेड ते परभणी, परळी, पालम, इसाद, राणीसावरगाव, कोद्रीकडे जाणाºया मुख्य रस्त्यासह ग्रामीण भागातील खळी, चिंचटाकळी, मैराळ सावंगी, गौंडगाव, पडेगाव, सुरळवाडी, महातपुरी, मसला, राणीसावरगाव, पिंपळदरी, नरळद, इरळद, धारासूर, सुनेगाव, सायाळा इ. ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे़ विविध अडचणींचा सामना करण्याबरोबरच थोडासाही पाऊस झाल्यास रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचते. अनेकवेळा या खड्ड्यांचा अंदाज लागत नाही व दर दिवशी लहान मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत़
गणेशोत्सवात या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडू नयेत, यासाठी खड्डे बुजवून रस्त्याची झालेली वाताहत दूर करावी, अशी मागणी होत आहे़
सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन
४शहरातील रस्त्यांसह गणेश विसर्जन मार्गावरील रस्त्यांची झालेली दुरवस्था दूर करून गणेश विसर्जनाचा मार्ग सुखकर करावा, यासाठी नगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे वेळीच लक्ष द्यावे. गणेशोत्सवापूर्वी शहर व परिसरातील सर्वच रस्ते खड्डेमुक्त करावेत, अशी मागणी गणेश भक्तांतून होत आहे़

Web Title: Parbhani: The main road in Gangakhed is a ditch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.