नाशिक : केरळ राज्यात तुफान पावसामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, साडेतीनशेहून अधिक व्यक्ती दगावून हजारो नागरिक बेघर झाले आहेत, अशा परिस्थितीत माणुसकीच्या भावनेतून एक दिवसाचे वेतन देण्याची तयारी महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दर्शविली असून, ...
पुरामुळे कापूस व सोयाबीन पिके दोन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. यामुळे शेकडो हेक्टरवरील शेती कुजण्याच्या मार्गावर आली आहे. याचा सर्वाधिक फटका राजुरा, बल्लारपूर, व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. ...
१५ आॅगस्टपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असून जमीनदोस्त झालेल्या एकूण घरांचा आकडा ३०० च्या वर जाण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घरांच्या पडझडीमुळे ...
तालुक्यातील हरसूल येथील अरुणावती नदीवरील लोखंडी पूल पुरात वाहून गेला. त्यामुळे हरसूल, गांधीनगर, आनंदवाडी व मोरखेड गावांचा संपर्क तुटला. हरसूल व परिसरात तब्बल २१६ मिमी पाऊस झाला. ...
शहरात थोडासा जरी पाऊस जरी पडला, तरी पूर येणाऱ्या लेंडी नाल्याने १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासीयांना वेठीस धरले. त्यामुळे दारव्हा शहरावरील लेंडी नाल्याचे संकट कधी टळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
जिल्ह्यात बुधवारपासून अविश्रांत कोसळणाऱ्या पावसाने तब्बल २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, महागाव या सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अस्मानी संकटाने तब्बल ३ हजार ७८५ घरांची पडझड झाली. ...
इंझोरी: जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत धो-धो पाऊस कोसळला. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या नद्यांत समाविष्ट असलेली अडाण नदी दुथडी भरून वाहत असून, या नदीवरील अडाण प्रकल्पही काठोकाठ भरला आहे. ...