अडाण नदी वाहतेय दुथडी भरून, प्रकल्पही काठोकाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 02:28 PM2018-08-18T14:28:06+5:302018-08-18T15:58:38+5:30

इंझोरी: जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत धो-धो पाऊस कोसळला. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या नद्यांत समाविष्ट असलेली अडाण नदी दुथडी भरून वाहत असून, या नदीवरील अडाण प्रकल्पही काठोकाठ भरला आहे.

Adan river flooded, dam level increase | अडाण नदी वाहतेय दुथडी भरून, प्रकल्पही काठोकाठ

अडाण नदी वाहतेय दुथडी भरून, प्रकल्पही काठोकाठ

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत धो-धो पाऊस कोसळला. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांपैकी एक असलेला अडाण प्रकल्प काठोकाठ भरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी: जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत धो-धो पाऊस कोसळला. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या नद्यांत समाविष्ट असलेली अडाण नदी दुथडी भरून वाहत असून, या नदीवरील अडाण प्रकल्पही काठोकाठ भरला आहे. त्यामुळे पुढील वर्षभरही या प्रकल्पावर आधारित गावांतील पाणीटंचाईची शक्यताच मिटली आहे.
वाशिम जिल्ह्यात २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी मध्यरात्री जोरदार हजेरी लावली. गुरुवारी रात्रभर जिल्हाभरात धो-धो पाऊस कोसळला. अवघ्या १० तासांत तब्बल १०३ मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यात करण्यात आली. या पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले, तसेच जमिनी आणि रस्तेही खरडून गेले. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या. नाले एक झाले. काही ठिकाणी, तर पुरामुळे पाच तास वाहतूकच खोळंबली होती. याच पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या नद्यांत समाविष्ट असलेली अडाण नदी दुथडी भरून वाहू लागली, तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांपैकी एक असलेला अडाण प्रकल्प काठोकाठ भरला आहे. या प्रकल्पातील जलसाठ्यामुळे आता पुढील वर्षभर परिसरातील गावांसह या प्रकल्पावरून पाणी पुरवठा होत असलेल्या गावांतील पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यताच मिटली आहे.

Web Title: Adan river flooded, dam level increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.