Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
‘गोविंदा आला रे आला...’ च्या जयघोषात शहरातील विविध शाळांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांची वेशभूषा केली होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. ...
दहीहांडी शिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमी अधुरीच ठरते. अशा या सोहळ्याचा थरार शनिवारी इतवारी येथील सराफा ओळी, माधवराव मुकाजी खुळे चौकात अनेकांना अनुभवता आला. ...
भाजपा आमदार राम कदम घाटकोपरमध्ये दरवर्षी दहिहंडी उत्सवाचं आयोजन करतात. मात्र गेल्या वर्षी राम कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांची दहीहंडी गाजली होती. ...