Shivitej woman Govinda pathak broke the sentiment of Sankalp Pratishthan dahi handi | संकल्प प्रतिष्ठानची मनाची दहीहंडी शिवतेज महिला गोविंदा पथकाने फोडली 

संकल्प प्रतिष्ठानची मनाची दहीहंडी शिवतेज महिला गोविंदा पथकाने फोडली 

ठळक मुद्दे उत्सवाचे संपूर्ण संयोजन नगरसेविका जयश्री फाटक यांनी केले होते.हंडी फोडण्याचा मान शिवतेज महिला गोविंदा पथकाला मिळाला. त्यांना खासदार राजन विचारे हस्ते रोख रक्कम, बक्षिस आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

ठाणे - शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव २०१९ च्या हंडी फोडण्याचा मान लालबागचा राजा गोविंदा पथक आणि महिलांसाठी राखीव असलेली हंडी फोडण्याचा मान शिवतेज महिला गोविंदा पथकाला मिळाला. त्यांना खासदार राजन विचारे हस्ते रोख रक्कम, बक्षिस आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सोबत सिने अभिनेते आणि उत्सवाचे सूत्र संचालक सुशांत शेलार, स्थायी समिती सभापती राम रेपाळे,  नगरसेवक मिनल संख्ये, नम्रता फाटक, उप विभाग प्रमुख राजु फाटक,  नगरसेवक भूषण भोईर, गुरुमुख सिंह, प्रतिष्ठान चे पदाधिकारी सर्वश्री बाबु महाडिक, संतोष बामणे, सुरेश कडू, अनिल पंडित, शैलेश सावंत, बाळा परब, शाखा प्रमुख तानाजी पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
यंदाचा उत्सव हा मोठ्या स्वरूपात साजरा न करता व पारंपरिक पद्धतीने कोणतीही स्पर्धा न करता एक उत्सव एक सण समजून साजरा करुन जास्तीत जास्त मदत या उत्सवाच्या माध्यमातून कोल्हापूर सांगली आणि कोकणातील शेतकऱ्यांना देण्यात येईल. असे आयोजक आमदार रविंद्र फाटक यांनी सांगितले होते. सुमारे १५० हुन अधिक पथकाने उत्सवाला भेट देऊन आपली नोंदणी केली आणि त्यातील १०० हुन अधिक पथकांनी विजयी सलामी दिली. सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह बक्षिसाची स्वरूपात करून गौरविण्यात आले. तसेच दहीकाला उत्सवामध्ये बिग बॉस फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिने गोंविंदा पथक मध्ये सामील होऊन हंडी फोडून एक वेगळा उत्साह निर्माण केला. उत्सवाचे संपूर्ण संयोजन नगरसेविका जयश्री फाटक यांनी केले होते.

Web Title: Shivitej woman Govinda pathak broke the sentiment of Sankalp Pratishthan dahi handi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.