‘गोविंदा आला रे आला...’ शहर परिसरात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:26 AM2019-08-25T00:26:43+5:302019-08-25T00:27:10+5:30

‘गोविंदा आला रे आला...’ च्या जयघोषात शहरातील विविध शाळांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांची वेशभूषा केली होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली.

 'Govinda aa ray aa ...' shouted in the city area | ‘गोविंदा आला रे आला...’ शहर परिसरात जल्लोष

‘गोविंदा आला रे आला...’ शहर परिसरात जल्लोष

googlenewsNext

नाशिक : ‘गोविंदा आला रे आला...’ च्या जयघोषात शहरातील विविध शाळांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांची वेशभूषा केली होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली.
नाएसो सोसायटी संचलित सागरमल मोदी विद्यालयात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांनी सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन केले. यावेळी मुलींनी गाणी म्हणून रासनृत्य सादर केले. मुलांनी दहीहंडी फोडली. कार्यक्रमाचे नियोजन प्राजक्ता शिरसाठ यांनी केले. यावेळी मंजूषा झेंडे, उज्ज्वला कासार, अशोक शिरुडे, अश्विनी पगार, क्रांती बोराटे, स्वाती महाजन आदी उपस्थित
होते.
नूतन मराठी शाळा
क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या नूतन मराठी प्राथमिक शाळेत दहीहंडी व गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना दहीहंडी सणाचे महत्त्व सांगण्यात आले. कार्यक्रमास सरला मांडवडे, छाया ठाकरे, सुवर्णा सांगळे, ज्योती फड, जयश्री पाटील, अशोक घुगे आदी उपस्थित होते.
आदर्श अभिनव शाळा
मविप्र समाजाचे आदर्श शिशु विहार व अभिनव बालविकास मंदिर, गंगापूररोड या शाळेत कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी मुख्याध्यापक मीनाक्षी गायधनी, वैशाली देवरे, ज्येष्ठ शिक्षक ज्योती पवार, उज्ज्वला पवार, अर्चना वाळके यांनी दहीहंडीचे पूजन केले. उपशिक्षक वैशाली मोरे व माधवी आहिरे यांनी गोपालकाल्याची व श्रीकृष्ण जन्माष्टमीची माहिती सांगितली. आदर्श व प्राथमिक विभागाचे विद्यार्थी राधाकृष्णाच्या वेशभूषेत आलेले होते. बालगोपाळांनी गोविंदा आला रे आलाच्या गजरात जल्लोषात दहीहंडी फोडली. वर्गवार विद्यार्थ्यांना गोपालकाल्याचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक मीनाक्षी गायधनी व सर्व शिक्षक, शिक्षिकांनी टिपऱ्या खेळून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
विल्होळीला दहीहंडी साजरी
विल्होळी येथे सालाबादप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रारंभी कोळीवाडा व डांगे गल्ली येथून दोन दहीहंड्यांची वाजतगाजत गावात मिरवणूक काढण्यात आली. गावातील भाविकांनी, दही, लाह्या, फुलहार, पैशांची माळ देत मिरवणुकीचे स्वागत केले. विल्होळी ग्रामदेवता हनुमान मंदिर येथे दोन्ही दहीहंडी बांधण्यात आल्या. विल्होळी गावातील दहीहंडी पारंपरिक पद्धतीची असल्याने आसपासच्या गावातून अनेक भाविक पारंपरिक दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी उपस्थित होते. ढोल-ताशाच्या गजरात नाचणाºया गोपाळांनी ही हंडी फोडली. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
व्ही. एन. नाईकमध्ये दहीहंडी साजरी
एकलहरे येथील व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था संचलित आदर्श प्राथमिक शाळेत दहीहंडी साजरी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाची तर विद्यार्थ्यांनी राधाची वेषभूशा करु न दहिकाला करु न दहीहंडी फोडली. त्यानंतर दहीकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक सुनीता शिंदे, शिक्षक मालती देवरे, चित्रकला भुसा, रु पाली सांगळे, पल्लवी वेढे, किरण गवार, प्रणाली सानप, गायत्री भिलोरे, तृप्ती कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Web Title:  'Govinda aa ray aa ...' shouted in the city area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.