देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
भाजपचा भक्कम गड मानल्या जाणाऱ्या बोरीवली मतदारसंघात सध्याचे आमदार विनोद तावडे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत इतर पक्षांचे उमेदवार किती तगडी लढत देतात, हे पाहणे उत्कंठापूर्ण ठरणार आहे. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी यांनी गुरूवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली ...
कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत काँग्रेसमध्ये दुमत निर्माण झाल्याचे चित्र दिसत असून, अनेक काँग्रेस नेते पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात मतप्रदर्शन करत आहेत. ...