ऊर्मिला जाहीरनामा समितीच्या सहअध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 01:16 AM2019-08-09T01:16:44+5:302019-08-09T01:17:06+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मुंबई काँग्रेसने विविध समित्यांची घोषणा केली

Co-chair of the Urmila Manifesto Committee | ऊर्मिला जाहीरनामा समितीच्या सहअध्यक्ष

ऊर्मिला जाहीरनामा समितीच्या सहअध्यक्ष

googlenewsNext

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मुंबई काँग्रेसने विविध समित्यांची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेली बॉलीवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरकडे जाहीरनामा समितीचे सहअध्यक्षपद देण्यात आले आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी या समित्यांची घोषणा केली. २५ जणांच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्षपद माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्याकडे सोपविण्यात आले असून सहअध्यक्ष म्हणून ऊर्मिला मातोंडकर काम पाहणार आहे. अध्यक्ष मिलिंद देवरा आणि कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची विशेष बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जाहीरमाना समिती, मीडिया-सोशल मीडिया आणि प्रसिद्धी समिती बरोबरच राजशिष्टाचार समितीची स्थापन करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. मुणगेकर आणि मातोंडकर यांच्यासह जाहीरनामा समितीत महापालिकेतील गटनेते रवी राजा, भास्कर शेट्टी, वीरेंद्र बक्षी, उमाशंकर ओझा, सुरेश कोपकर यांचा समावेश आहे. तर प्रसिद्धीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षपद चरण सिंग सप्रा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या समितीत एकूण १३ जणांची निवड करण्यात आली असून संदेश कोंडविलकर यांच्यासह आनंद शुक्ला, झाकीर अहमद या सदस्यांचा समावेश आहे. तर पाच जणांची राजशिष्टाचार समितीची घोषणाही या वेळी करण्यात आली आहे. ज्यात जावेद श्रॉफ, प्रवीण नाईक, शीवजी सिंग यांच्यासह इतर दोघा जणांची या समितीत निवड करण्यात आली आहे.
समित्यांमधून संजय निरुपम आणि त्यांच्या समर्थकांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे. निरुपम यांच्या अध्यक्षपदाच्या काळात दिवंगत काँग्रेस नेते गुरुदास कामत समर्थकांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप झाला होता.

Web Title: Co-chair of the Urmila Manifesto Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.