शून्य कचरा मोहिमेला आजपासून प्रारंभ; नियोजनात लागणार कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 01:00 AM2020-05-25T01:00:00+5:302020-05-25T01:00:07+5:30

केडीएमसीचा गुन्हे दाखल करण्याचा इशारा

 Zero waste campaign starting today; Planning tests | शून्य कचरा मोहिमेला आजपासून प्रारंभ; नियोजनात लागणार कसोटी

शून्य कचरा मोहिमेला आजपासून प्रारंभ; नियोजनात लागणार कसोटी

Next

कल्याण : केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यात ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक केले गेले आहे. वर्गीकरण न करणाºया, प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाºया आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात आवश्यकतेनुसार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. प्लास्टिकबंदी, शालेयस्तरावर ई-वेस्ट गोळा करणे, कॉल आॅन डेब्रिज, कचराकुंडीमुक्त शहर आदी उपक्रमांचे प्रतिसादाअभावी तीनतेरा वाजले असताना शून्य कचरा मोहिमेला कसा प्रतिसाद मिळतो? याकडे लक्ष लागले आहे.

पश्चिमेतील नागरिकांची आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून सुटका करण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. एप्रिल २०१८ मध्ये वर्गीकरण न केल्यास कचरा न उचलण्याचा तसेच आस्थापना व गृहनिर्माण सोसायट्यांवर दंड आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. मात्र, नियोजनच नसल्यामुळे ती मोहीम बारगळली होती. राज्य सरकारची प्लास्टिक बंदी, कॉल आॅन डेब्रिज या योजनाही बासनात गुंडाळाव्या लागल्या. आता पुन्हा शून्य कचरा मोहीम पालिकेतर्फे सोमवारपासून राबविली जाणार आहे.

महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. कोकरे स्वत: गृहसंकुल आणि वसाहतींमध्ये जाऊन मार्गदर्शन करत आहेत. यामध्ये आरोग्य निरीक्षक आणि स्वच्छता मार्शल यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रशासनाचे नियोजन आणि नागरिकांची मानसिकता यावर या शून्य कचरा मोहिमेचे यश अवलंबून आहे.

ओला कचरा प्लास्टिक पिशव्यांमध्ये नको

च्ओला कचरा हा स्वतंत्र डस्टबिनमध्ये ठेवून तो देण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत तो प्लास्टिक पिशव्यांमध्ये बांधला जाणार नाही अथवा त्यामध्ये प्लास्टिक, कागद आणि अन्य कचºयाचे घटक राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत.
च्ओला कचरा दररोज उचलण्यात येणार आहे, तर सुका कचरा घरात साठवून अथवा सोसायटीत वेगवेगळ्या गोण्या अथवा डब्यांमध्ये साठवून घंटागाडीमध्ये देण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सुका कचरा बुधवारी आणि रविवारी स्वीकारण्यात येणार आहे.

Web Title:  Zero waste campaign starting today; Planning tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.