वीजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, लटकणाऱ्या केबलने केला घात

By कुमार बडदे | Published: August 16, 2023 04:56 PM2023-08-16T16:56:49+5:302023-08-16T17:11:08+5:30

दूध आणण्यासाठी दुकानात जात असताना घडला दुर्दैवी प्रकार

Youth dies of electric shock, strangled by hanging cable | वीजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, लटकणाऱ्या केबलने केला घात

वीजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, लटकणाऱ्या केबलने केला घात

googlenewsNext

कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्राः दूध आणण्यासाठी दुकानात जात असताना वीज वाहक खांबावरुन खाली पडलेल्या विद्युत केबलच्या संपर्कात आलेल्या रवी चौहान (वय २८) या तरुणाचा शाँक लागून घटनास्थळावर मृत्यू झाला.ही घटना बुधवारी सकाळी मुंब्रा बायपास जवळील सैनिक नगर परीसरात घडली.या परीसरातील केबल ठराविक दिवसांनी खाब्यावरुन खाली पडत असल्याच्या घटना वारंवार  घडत असल्यचा दावा माजी नगरसेवक शाह आलम तसेच स्थानिक रहिवाशांनी केला.

आठ दिवसांपूर्वी देखील पडलेल्या केबलच्या संपर्कात आलेल्या मुलीच्या आरोग्यात अद्याप सुधारणा झाली नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली.मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.दरम्यान मृताच्या नातेवाईकांना १० लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी.तसेच वारंवार पडत असलेल्या केबलची तसेच इतर विद्युतीकरणाची कामे त्वरीत करण्यात यावीत.आशी मागणी आलम यांनी वीज वितरण करत असलेल्या टोरंट कंपनीकडे केली आहे.

Web Title: Youth dies of electric shock, strangled by hanging cable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.