शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरहून आणलेल्या गांजासह महिलेला साथीदारासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:46 IST

ठाणे : गांजाची तस्करी करणाऱ्या रेश्मा शहा (३६, रा. शिवाजीनगर, ठाणे) आणि अभिषेक जगदाळे (३५, रा. वागळे इस्टेट, ठाणे) ...

ठाणे : गांजाची तस्करी करणाऱ्या रेश्मा शहा (३६, रा. शिवाजीनगर, ठाणे) आणि अभिषेक जगदाळे (३५, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून ४४ किलोचा पाच लाख ६६ हजारांचा गांजा हस्तगत केला आहे. हा गांजा त्यांनी अहमदनगर येथून आणला होता.

खारेगाव टोलनाका येथील रस्त्यावर एक महिला तिच्या साथीदारासह गांजा विक्रीसाठी रिक्षातून येणार असल्याची ‘टीप’ खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक प्रशांत भुर्के यांना मिळाली होती. त्याआधारे १३ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक रमेश कदम, जमादार संजय भिवणकर, हवालदार कल्याण ढोकणे, संदीप भोसले, भुर्के, संदीप भांगरे आणि प्रेरणा जगताप आदींच्या पथकाने सापळा रचून रिक्षाचालक अभिषेक आणि रेश्मा या दोघांना रिक्षासह ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांच्याकडून ४४.१५ किलोचा पाच लाख ६६ हजार १०० रुपयांचा गांजा जप्त केला. दोन्ही आरोपींना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी हा गांजा अहमदनगर जिल्ह्यातून आणल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली. तो कोणाकडून आणला तो कोणाला विक्री करणार होते? याचीही सखोल चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप भोसले यांनी सरकारतर्फे कळवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.