शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महानगरपालिका मदत करणार का?

By admin | Updated: September 26, 2015 00:20 IST

महानगरपालिकेत आर्थिक विवंचना असल्याने शहराच्या विकास कामांसाठी शहरातील लोकप्रतिनिधी राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मदत मागीत आहेत

भिवंडी : महानगरपालिकेत आर्थिक विवंचना असल्याने शहराच्या विकास कामांसाठी शहरातील लोकप्रतिनिधी राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मदत मागीत आहेत. तर दुसरीकडे विविध कारणे दाखवून नगरसेवकांनी विविध अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याच्या शिफारशी मनपा प्रशासनाकडे केल्या असून प्रशासन ही मदत देणार आहे काय? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.शहरातील कल्याणरोड शफीक कंपाऊण्ड येथे मोती कारखान्यास आग लागून त्यात मालकासह दोन कामगारांचा मृत्यू झाला. या आगीच्या वेळी विहीत मुदतीत अग्निशामक दलाचे कर्मचारी न पोहोचल्याने या घटनेस मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका ठेवून वार्ड क्र.३४ चे नगरसेवक दीन मोहम्मद शाह मोहम्मद खान यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली आहे. वास्तविक हा मोती कारखाना अवैधरित्या चालत होता,अशी माहिती परिसरांतील नागरिकांकडून मिळते.तसेच प्रभाग समिती क्र.५ च्या कार्यक्षेत्रातील सलीम मंजील परिसरांत मनपाच्या आदेशाने पाणीपुरवठा करणाऱ्या खाजगी टँकरच्या चालकाकडून दोन महिन्यापूर्वी झालेल्या अपघातात इकरा पिर मोहम्मद अन्सारी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यांच्या कुटुंबांना मनपाने आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी प्रभाग समितीच्या सभापती अन्सारी रेश्मा मो.वसीम व वार्ड क्र.११चे नगरसेवक मोमीन परवेज अह.सिराज अह.यांनी केली आहे. वास्तविक मृतांच्या कुटूंबीयांना टँकर मालक व चालकांनी मदत देणे अपेक्षीत आहे. कामतघर येथील वऱ्हाळा तलावाच्या देखभालीसाठी मनपा प्रशासनाने ठेक्याव्दारे सुरक्षारक्षकांची नेमणूक केली असताना तेथे पाय धुण्यासाठी गेलेल्या साकीब मेहबुब शेख व दिपककुमार गुप्ता या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. त्या मुलांच्या कुटूंबीयांना मनपाने अर्थिक मदत देण्याची मागणी नगरसेवक कमलाकर पाटील,अन्सारी साजीद हुसैन तफज्जुल हुसैन,अन्सारी नासीर(पप्पू)अब्दुल हक्क यांनी केली आहे. तर वार्ड क्र.३२मध्ये दूषितपाणी पुरवठा झाल्याने बहुसंख्य नागरिकांना जुलाब,उलट्या व ताप या सारख्या आजाराची लागण झाली.त्या काळात मनपा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे विघ्नेश सुरेश टवटी हा मुलगा दगावला. (प्रतिनिधी)