शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला न्याय कधी मिळणार?

By admin | Updated: May 13, 2017 00:55 IST

एकाच्या चुकीचा त्रास सगळ्यांना कशासाठी, आमचा संसार या दुकानांवर होता, आम्ही काय रस्त्यावर दुकाने थाटली नव्हती

अजित मांडके । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकाच्या चुकीचा त्रास सगळ्यांना कशासाठी, आमचा संसार या दुकानांवर होता, आम्ही काय रस्त्यावर दुकाने थाटली नव्हती, आमची रोजीरोटी होती, पालिकेनेचे आमचे या ठिकाणी पुनर्वसन केले होते, मग कारवाई करताना किमान साहित्य तरी काढण्याची मुभा द्यायला हवी होती, आम्हाला न्याय हवा असल्याचा एकच टाहो गावदेवी भागात उद्ध्वस्त झालेल्या दुकानदारांनी फोडला आहे. अचानक रोजीरोटीच उद्ध्वस्त झाल्याने अनेकांचे डोळे पाणावले होते. त्यामुळे आता हे दुकानदार एकत्र आले असून कायदेशीर बाजू तपासून न्यायालयात जाण्याची तयारी त्यांनी केली आहे. बुधवारी संध्याकाळी गावदेवी परिसरात कारवाई करायला गेलेले महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना फेरीवाल्यांकडून जबर मारहाण झाल्यानंतर याची गंभीर दखल पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतली आहे. पालिका अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्याच्या दृष्टीनेच माळवी यांच्यावर पूर्वनियोजित हल्ला असून तो प्रशासनावरच असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, गुरुवारी सायंकाळी येथील दुकानदारांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, पूर्वसूचना न देता, २७ दुकानांवर पालिकेने हातोडा टाकला. ही लोकशाही नसून हुकूमशाही असल्याचा आरोप आता पालिका आयुक्तांविरोधात होऊ लागला आहे. १५ ते १८ वर्षांपासून येथे अनेक दुकानदार रोजीरोटी कमवत होते. काहींचे चपलांचे, ज्युसचे, कपड्यांचे, कटलरीचे अशी २७ दुकाने होती. परंतु, गुरुवारी या सर्वच दुकानांवर अचानक रागाच्या भरात आयुक्तांच्या आदेशाने बुलडोजर फिरवला गेला. त्यामुळे आज या सर्वच दुकानदारांचे संसार रस्त्यावर आले आहेत. एकाने चूक केली होती. त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. मग, त्याच्या चुकीचे भोग आमच्या माथी कशासाठी, असा सवाल आता या दुकानदारांनी उपस्थित केला आहे. आधीच आम्ही आमची दुकाने रस्ता रुंदीकरणात दिली होती. त्यानंतर, पालिकेनेच या ठिकाणी आमचे पुनर्वसन केले होते. परंतु, अशा हुकूमशाही पद्धतीने कारवाई करायची कशासाठी, असा सवालही आता उपस्थित होऊ लागला आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. पालिकेने कारवाई करताना किमान नोटीस देणे गरजेचे होते किंवा कारवाई करण्याआधी साहित्य तरी काढायला देणे अपेक्षित होते. कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय अशी कारवाई करून पालिकेला काय मिळाले. त्यामुळे आता आम्हाला न्याय हवा, हे सांगतानाच अनेकांच्या डोळ्यांतील अश्रू अनावर झाले होते. अनेक दुकानदार शुक्रवारी या दुकानांकडे बघून अक्षरश: रडत होते. काहींच्या तर अश्रूंचा बांधच फुटला होता. काहींनी कपाळाला हात मारून, दुकानातील साहित्य शिल्लक आहे का म्हणून, शोधाशोध करीत होते. परंतु, त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळेच पालिका आयुक्तांच्या या कारवाईचा निषेध करून शुक्रवारी या दुकानदारांनी बैठक घेतली. या बैठकीत कायदेशीर बाबी तपासून वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारीदेखील केल्याचे त्यांनी सांगितले.