शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 08:28 IST

Thane Rains: ठाणे जिल्ह्याला रविवारी रात्रीपासून पावसाने झाेडपले.

ठाणे: जिल्ह्यात सोमवारी दिवसभर संततधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पावसाच्या साचलेल्या पाण्यातून वाट काढत शाळा गाठावी लागली. दरम्यान, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड या माळशेज डोगरावर रविवारी नवी मुंबईचे सात ते आठ ट्रेकर्स गेले असता, त्यांचे पथक प्रमुख साईराज धनंजय चव्हाण (२२ वर्षे) हे पाय घसरून दरीत पडले. ट्रेकर चव्हाण यांचा शोध लागला आहे. पण ते कोणत्याही प्रकारची हालचाल करीत नाहीत. दरीतून त्यांना बाहेर काढणे पाऊस आणि धुक्यामुळे कठीण जात आहे, असे मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सांगितले. 

जिल्ह्याला रविवारी रात्रीपासून पावसाने झाेडपले. मुरबाडच्या ऐतिहासिक सिद्धगडावर नवी मुंबईचे ट्रेकर्स रविवारी सकाळी ट्रेकिंगसाठी गेले होते. दुपारी ३:३० वाजता पथक प्रमुख चव्हाण यांचा पाय घसरून ते खोल दरीत पडले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुरबाड तहसीलदारांच्या यंत्रणेसह पाेलिस पथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला. सोमवारी भरपावसात सुरू असलेल्या या शोधकार्याला यश येऊन दुपारी ३:३० वाजता त्यांचा शोघ लागला.

गेरसे पुलाची पाहणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. ठाणे शहर परिसरात सोमवारी दिवसभरात सरासरी ५२ मि.मी. पावसाची नोंद झाली. मागील २४ तासांत जिल्ह्यात ३६ मि.मी. पाऊस  झाला. सर्वाधिक पाऊस ठाणे तालुक्यात ५५ मि.मी. झाला तर उल्हासनगरला सर्वात कमी २० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. पावसामुळे शहापूर तालुक्यातील दहागाव मुख्य रस्त्यावर झाड पडल्यामुळे वासिंद ते वाडा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. पुण्याच्या इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेमुळे कल्याण व शहापूर तालुक्याला जोडणारा वासिंद शहरातील भातसा नदीवरील जुन्या गेरसे पुलाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली. 

टॅग्स :RainपाऊसthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र