शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: March 22, 2017 01:23 IST

उल्हास नदीत हिरव्या प्रदूषणाचा रंगाचा तवंग पसरल्याने त्याचा फटका मीरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे.

भार्इंदर : उल्हास नदीत हिरव्या प्रदूषणाचा रंगाचा तवंग पसरल्याने त्याचा फटका मीरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे. पुरेसे पाणी उचलता येत नसल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून अजून दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होतानाच रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मीरा-भार्इंदर शहराला स्टेमकडून पाणीपुरवठा होतो. उल्हास नदीतून ते पाणी उचलले जाते. पण या पुरवठ्याला जलप्रदूषणाचा फटका बसल्याने जांभूळ येथे स्टेमने नवी जलवाहिनी टाकून तेथूनच पाणी उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे हा फरक पडल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी सांगितले. स्टेममार्फत दररोज ८६ एमएलडी पाणीपुरवठा होतो. त्याचा मुख्य जलस्त्रोत उल्हास नदी असून नदीवर शहाड येथे बंधारा बांधण्यात आला आहे. तेथेच असलेल्या ८० फूट खोल विहिरीतून पाणी उचलले जाते. पुढे ते टेमघर येथील जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द केले जाते आणि वितरित केले जाते. परंतु, उल्हास नदीपात्रातील पाण्यावर २० मार्चपासून हिरव्या रंगाचा प्रदूषित तवंग येतो आहे. त्यामुळे स्टेमचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आला आहे. याबाबत चौकशी केल्यावर बंधऱ्याच्या वरच्या बाजुला दीड किलोमीटर अंतरावर जल प्रदूषण झाल्याचे निष्पन्न झाले. स्टेमने ती माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविल्यानंतर पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले. जलप्रदुषणामुळे कोणी बाधित झाल्याची माहिती अद्याप मिळाली नसली तरी त्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी ३.३० वाजल्यापासुन रात्री ९ वाजेपर्यंंत ५.३० तास शहाडच्या पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे शहराला ३० एमएलडी पाणीपुरवठा कमी झाला. प्रदूषण निवळल्यानंतर तो सुरळीत होतो. मात्र त्याचा फटका मीरा-भाईंदरमधील पाणीपुरवठ्याला बसला. (प्रतिनिधी)