शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शार्लेट तलावात पाण्याचे पुनर्भरण

By admin | Updated: October 31, 2015 00:08 IST

माथेरान या पर्यटनस्थळी स्थानिक आणि पर्यटकांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या शार्लेट तलावामधून (लेक)मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असते

कर्जत : माथेरान या पर्यटनस्थळी स्थानिक आणि पर्यटकांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या शार्लेट तलावामधून (लेक)मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असते. गळती झालेले पाणी खालच्या भागात साठविले जाते. त्यानंतर ते पाणी पुन्हा उचलून तलावात सोडले जाते. ही योजना माथेरानमध्ये शंभर टक्के यशस्वी झाली आहे. असा प्रयोग करून माथेरानमध्ये जीवन प्राधिकरणाने पाण्याचा थेंबदेखील वाया जाणार नाही याची काळजी घेण्याचे काम सुरू आहे. ब्रिटिशांनी दीडशे वर्षांपूर्वी वसविलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पिण्याचे पाणी तेथे राहणाऱ्या लोकांना मिळावे यासाठी काही धरणे बांधली. माथेरानला येणारे पर्यटक आणि स्थानिक लोक यांना सर्वाधिक पाणीपुरवठा ज्या शार्लेट तलावामधून होतो त्या तलावाच्या मुख्य बांधातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असते. माथेरानमध्ये ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते. अशा वेळी गळती होऊन खाली गेलेले पाणी वाया जाऊ नये म्हणून माथेरानच्या शार्लेट तलावाची जबाबदारी असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विशेष काम तेथे करीत असते. सतत होणाऱ्या पाणी गळतीमुळे जरी शार्लेट लेक तलावास धोका निर्माण होत आहे. तलावातील पाणी अधिकाधिक लोकांना पिण्यासाठी उपलब्ध व्हावे म्हणून जीवन प्राधिकरण तलावातून गळती झालेले पाणी खालच्या भागात साठविण्याचे काम करीत असते.तेथे एक विहीर बांधली असून विहिरीत साठून राहिलेले पाणी पुन्हा जलवाहिनीमधून पुन्हा तलावात पंपाने टाकले जाते. त्यासाठी गळती झालेले पाणी पुन्हा साठवून ठेवले जाते, त्या विहिरीजवळ पंप हाऊस देखील उभारण्यात आला आहे. या अभिनव योजनेमुळे माथेरानला पाणीपुरवठा करणारा शार्लेट लेकमधून जरी पाण्याची गळती सुरू असली तरी ते पाणी खाली दरीमध्ये जाऊ नये याची काळजी जीवन प्राधिकरण घेत आहे. ज्यावेळी तलावातून गळती झालेले पाणी विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात साचले जाते, त्यानंतर पंप सुरू करून ते पुन्हा तलावात आणले जाते, असे शाखा अभियंता भोसले यांनी सांगितले. (वार्ताहर)