शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 25, 2025 14:26 IST

Vithabai, oldest living person in Maharashtra passes away: या आजीबाईंनी आपल्या शतकभराच्या आयुष्यात काळाचे अनेक टप्पे, बदलती पिढी, परंपरा आणि संस्कृतीचे रूपांतर जवळून अनुभवले.

Vithabai, oldest living person in Maharashtra passes away | प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महाराष्ट्रातील वयाने सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या विठाबाई दामोदर पाटील (वय ११४) यांचे आज सकाळी ६ वाजता निधन झाले. पाच पिढ्या आपल्या छायेखाली वाढताना पाहण्याचे भाग्य लाभलेल्या या आजीबाईंनी आपल्या शतकभराच्या आयुष्यात काळाचे अनेक टप्पे, बदलती पिढी, परंपरा आणि संस्कृतीचे रूपांतर जवळून अनुभवले.

दरवेळी काठी टेकत मतदान केंद्रात हजेरी लावणाऱ्या विठाबाई या लोकशाहीच्या संस्कारांचा जिवंत आदर्श होत्या. त्यांना पाहण्यासाठी मतदारांच्या रांगाही वाट पाहत असत. पत्रकारांनीही दरवेळी त्यांच्या कौतुकाने बातम्या केल्या होत्या. देश बदलला, सरकारे बदलली, पण मतदानाचा त्यांचा निश्चय कधीच ढळला नाही.

विठाबाई यांचा जन्म १९११ साली शिळगाव (कल्याण) येथे झाला. विवाहानंतर त्या कोपरी गावात स्थायिक झाल्या. आयुष्यभर आगरी-कोळी परंपरेचे मूल्य, कष्ट आणि मातीशी नाळ जपणाऱ्या या कणखर मातोश्री होत्या. त्यांच्या मागे सहा मुले, सहा सुना, नातवंडे, पतवंडे असे मोठे कुटुंबीय जाळे आहे. त्या गवदेवीचे अध्यक्ष यांच्या मातोश्री होत्या. आज सकाळी ६ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यसंस्कार सकाळी ११ वाजता कोपरी स्मशानभूमी येथे करण्यात आले. परंपरेनुसार १०० वर्षे पार केलेल्या ज्येष्ठांना आदरार्थ भजन मंडळ, ब्रास बँड आणि फटाक्यांच्या साक्षीने अंत्ययात्रेला सन्मान दिला जातो, तसा त्यांचा सन्मान करण्यात आला.

“ही आमच्या समाजाची कृतज्ञतेची परंपरा आहे,” असे नात जावई हेमंत पाटील यांनी सांगितले. विठाबाईंच्या जाण्याने कोपरी गावावर एक युग संपल्याची भावना दाटून आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thane: Maharashtra's Oldest Woman, Vithabai, Dies at 114

Web Summary : Vithabai Damodar Patil, Maharashtra's oldest resident, passed away at 114. Witnessing five generations, she was a symbol of democratic values, never missing an election. Born in 1911, she upheld Agri-Koli traditions. Her funeral was held with traditional honors in Kopri.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यूthaneठाणे