शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अनुजा अवकाश केंद्रास तारांगण शास्त्रज्ञांची भेट

By admin | Updated: January 3, 2017 05:28 IST

डहाणू तालुक्यातील कासा येथील खगोलप्रेमी चंद्रकांत घाटाळ यांनी मागील वर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अनुजा अवकाश संशोधन केंद्र सुरू केले

शशिकांत ठाकूर, कासाडहाणू तालुक्यातील कासा येथील खगोलप्रेमी चंद्रकांत घाटाळ यांनी मागील वर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अनुजा अवकाश संशोधन केंद्र सुरू केले असून नुकताच नेहरू तारांगण येथील शास्त्रज्ञांच्या एका गटाने ‘पिधान’ च्या नोंदीसाठी भेट दिली.मुंबई येथील नेहरू तारांगण येथील शास्त्रज्ञांच्या एका गटाने एका खगोलीय घटनेचा अभ्यास करण्यासाठी थेट कासा येथील अनुजा अवकाश संशोधन केंद्रास तातडीने भेट दिली. २५ डिसेंबर रोजी पहाटे ३:२७ वाजता एक महत्वाची खगोलीय घटना घडणार होती. एक लघुग्रह एका ताऱ्याला झाकणार होता. याला खगोलीय भाषेत ‘पिधान’ असे म्हणतात. ही घटना फक्त काही सेकंद दिसणार होती. त्या घटनेच्या वेळेस ज्या नोंदी घेतल्या जातात त्यामुळे त्या लघुग्रहाचे आकारमान किती असावे याचा अंदाज करता येतो. असे अभ्यासकांचे मत आहे. अशा प्रकारच्या खगोलीय दुर्मिळ घटनेचा अभ्यास येथे करण्यात आला. या दुर्मिळ घटनेचा अभ्यास करण्यासाठी अतिशय शांत आणि मोकळे अवकाश लागते. यासाठी नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी चंद्रकांत घाटाळ यांच्याशी संपर्क साधून हा कार्यक्रम निश्चित केला होता. त्यासाठी शास्त्रज्ञांनी टेलीस्कोप आणले होते. येथील गावदेवी मैदानात हे निरिक्षण करण्यात आले. दरम्यान लोकांनी गर्दी करून व्यत्यय आणू नये म्हणून घाटाळ यांच्याकडून गुप्तता पाळल्याचे सांगण्यात आले. निरिक्षणा दरम्यान व्यवस्था करतांना जि.प. सदस्य किशोर बरड व कासा बरडपाडा येथील मुलांनी विशेष मेहनत घेतली.(वार्ताहर)