शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

विजय कासटला न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: September 10, 2015 02:41 IST

पेण येथील बाळगंगा सिंचन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेल्या तत्कालीन शाखा अभियंता विजय कासटला ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ठाणे : पेण येथील बाळगंगा सिंचन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेल्या तत्कालीन शाखा अभियंता विजय कासटला ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर निसारच्या आईवडिलांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज त्यांनी चर्चाअंती मागे घेतला आहे. त्यांना अटक करण्यापूर्वी ७२ तासांची नोटीस बजावण्याचे आदेश त्या वेळी न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. तसेच निसारच्या हस्ताक्षरांचे नमुने घेण्यासही परवानगी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.३ सप्टेंबर रोजी कासटसह खत्री बंधूंना मुंबईतून ठाणे लाचलुचपत विभागाने अटक केली होती. कासटची पोलीस कोठडी बुधवारी संपल्याने त्याला ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांच्यासमोर हजर केले होते. त्या वेळी त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. तसेच अटक करण्यात आलेला कंत्राटदार निसारची आई जुतैन आणि वडील फतेह यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात झालेल्या चर्चेअंती त्यांनी अर्ज मागे घेतला. त्या दोघांना अटक करायची असेल तर त्यांना ७२ तासांची नोटीस देण्याचे आदेश या वेळी न्यायालयाने पोलिसांना दिले. त्यांना पुन्हा अटकपूर्व जामीन अर्ज करता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.