शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: December 25, 2016 04:36 IST

निवडणूक जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी ठरवण्यावरून मतभेद टोकाला गेल्याने उल्हासनगर भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर उभी असल्याची माहिती पक्षातील नेत्यांनी दिली.

- सदानंद नाईक,  उल्हासनगरनिवडणूक जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी ठरवण्यावरून मतभेद टोकाला गेल्याने उल्हासनगर भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर उभी असल्याची माहिती पक्षातील नेत्यांनी दिली. ओमी कलानी यांच्या प्रवेशावरूनच पक्षात दोन तट पडले आहेत. कोअर कमिटीतील वादही विकोपाला गेले आहेत. पक्षातील दुसऱ्या गटाने पुन्हा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन एकहाती सत्तेसाठी ओमी टीमला प्रवेश देण्याची मागणी केली. त्याच वेळी कुणा एका व्यक्तीकडे पक्षाच्या निर्णयाचे सर्वाधिकार दिलेले नाहीत, असे प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केल्याने माजी आमदार कुमार आयलानींविरोधी गटाने उचल खाल्ली आहे.दरम्यान, ओमी यांनी मात्र भाजपा प्रवेशाचा मुद्दा बाजूला सारल्याचे सांगत त्यांच्याशिवाय निवडणुकीची रणनीती ठरवल्याचे स्पष्ट केल्याने राजकीय घोळ संपण्याची चिन्हे नाहीत. निवडणूक तोंडावर आल्याने ओमी कलानी टीमच्या प्रवेशासाठी पक्षाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेश सुखरामानी यांनी प्रदेशाध्यक्षांना साकडे घातले. मुंबई विमानतळावर त्यांनी प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली. स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत माजी आमदार कुमार आयलानी यांना अधिकार दिले का, अशी विचारणा त्यांनी केली. पालिकेवर पक्षाचा महापौर बसवण्यासाठी ओमी कलानी टीमला निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रवेश देण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यावर निर्णय घेणार असल्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी दिल्याचे सुखरामानी यांचे म्हणणे आहे. याबाबतचा दुजोरा अन्य भाजपा पदाधिकारी यांना दिला आहे.ओमी कलानी टीमचा भाजपा प्रवेश निश्चित असून चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असल्याची माहिती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. कुमार आयलानी यांच्या विरोधामुळे ओमी टीमचा प्रवेश लांबल्याने कलानी टीमचे सदस्य नाराज आहेत. शिवसेनेशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणुका लढवून टीमचा महापौर बसवू, असा नारा समर्थक देत आहे. तर, ओमी कलानी यांनी प्रवेशाबाबत आता विचार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ओमी कलानी यांच्या प्रवेशनाट्याने पुन्हा भाजपातील वाद चव्हाट्यावर आले असून पक्षात फूट अटळ असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. ओमी टीमला प्रवेश न दिल्यास अर्धेअधिक नगरसेवक, पदाधिकारी त्या टीमसोबत जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.कलानींचा प्रवेश निश्चित : सुखरामानी उल्हासनगरात भाजपाचा महापौर आणण्यासाठी ओमी कलानी टीमला प्रवेश देण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. त्यांचा प्रवेश निश्चित आहे. यापूर्वीही कोअर कमिटीतील ७० टक्के पदाधिकाऱ्यांनी प्रवेशाच्या बाजूने असल्याचे निवेदन दिले आहे. दानवे हे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार आहेत. ओमी कलानी टीम, भाजपा, साई पक्ष यांची युती झाल्यास पालिकेची सत्ता भाजपाकडे येईल, असा दावा त्यांनी केला.आता भाजपाचा विचार नाही : ओमी शहर विकासासाठी भाजपात प्रवेशाचा प्रस्ताव प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गेल्या सहा महिन्यांपूर्वी आला. आता भाजपाचा विचार न करता आम्ही ४८ जागांवर उमेदवार जाहीर केले असून प्रचारही सुरू केला आहे. पालिका निवडणुकीतील स्थानिक पातळीवरील युतीचा अधिकार माझ्याकडे व कोअर कमिटीकडे आहे. ओमी टीमच्या प्रवेशाला आमचा विरोध कायम आहे. सुखरामानी यांनी प्रदेशाध्यक्षांकडे कोणती बोलणी केली, याची कल्पना नाही.