ठाणे जिल्ह्यात दोन हजार ७७ रुग्णांचा कोरोनावर विजय; नवजात बालकासह आजीचीही मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 12:57 AM2020-05-25T00:57:17+5:302020-05-25T06:39:42+5:30

ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

 Two thousand 77 patients win corona in Thane district; Grandmother overcame the newborn baby | ठाणे जिल्ह्यात दोन हजार ७७ रुग्णांचा कोरोनावर विजय; नवजात बालकासह आजीचीही मात

ठाणे जिल्ह्यात दोन हजार ७७ रुग्णांचा कोरोनावर विजय; नवजात बालकासह आजीचीही मात

Next

ठाणे : एकीकडे ठाणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असली तरी, दुसरीकडे आतापर्यंत तब्बल २ हजार ७७ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवल्याचे आशादायी वस्तुस्थितीही आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. विजयी विरांमध्ये नवजात बालकापासून ९१ वर्षांच्या आजीसह सर्वच वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे.

ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ३० हजार ३३४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील २२ हजार ९६२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ५ हजार ३८८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत १६३ जणांचे मृत्यू झाले असून, सद्य:स्थितीत ३ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली महसूल, आरोग्य, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद तसेच इतर सर्वच विभाग उपलब्ध सामग्री आणि मनुष्यबळ यांच्या आधारे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मर्यादित रहावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोना रुग्ण बरे होत असून काळजी करू नका, काळजी घ्या असा विश्वास जिल्हावासियांच्या मनात निर्माण करण्यासाठी यंत्रणेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासनाचे प्रयत्न या बळावर युद्ध जिंकणे सहज शक्य असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.

आतापर्यंत ३0 हजार ३३४ नमुने तपासले. त्यापैकी २२ हजार ९६२ निगेटिव्ह तर पाच हजार ३८८ पॉझिटिव्ह आले.
बदलापूर 46
ठाणे ग्रामीण 44
उल्हासनगर 34
भिवंडी 32
अंबरनाथ 18

Web Title:  Two thousand 77 patients win corona in Thane district; Grandmother overcame the newborn baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.