Two killed in accident on Mumbai-Nashik highway | मुंबई-नाशिक महामार्गावरील अपघातात दोघे ठार
मुंबई-नाशिक महामार्गावरील अपघातात दोघे ठार

आसनगाव/ भातसानगर : घरी न सांगता जोधपूरहून पळालेल्या तरूणतरूणीचा मंगळवारी मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. नंदलाल गायना (२३) आणि किरण बिष्णोई (१४) अशी त्यांची नावे आहेत.
भरधाव गाडीने गॅस टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात गाडीतील या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आसनगाव परिसरात असलेल्या परिवार गार्डन हॉटेलसमोर घडली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडीतील गंभीर अवस्थेत असलेल्या चौघांना शहापूरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, यापैकी दोघांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त गाडी राजस्थानमधील असून ती टुरिस्ट गाडी आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त गाडीसमोरील भागाचा संपूर्ण चेंदामेंदा झाला. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. शहापूर महामार्ग पोलिसांकडून या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Two killed in accident on Mumbai-Nashik highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.