शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन समिती निवडणुकीत भाजपला दगाफटक्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:49 IST

२३ नगरसेवकांना बजावला व्हिप; पालन न केल्यास कारवाई

ठाणे : ठाणे परिवहन समितीमध्ये १२ सदस्य निवडून जाणार असले तरी त्यासाठी १४ जणांनी अर्ज सादर केले आहेत. त्यात भाजपला एका जागेवर रोखण्यासाठी राष्टÑवादी आणि शिवसेनेची खलबते सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दगाफटका होण्याची भीती असल्याने भाजपाच्या गटनेत्यांनी पक्षाच्या सर्व २३ नगरसेवकांना मंगळवारी व्हिप बजावला. निवडणूक होईपर्यंत सर्वांनी या व्हिपचे पालन करावे, अन्यथा कारवाई केली जाईल,असेही त्यात स्पष्ट केले आहे.राज्यात महाविकास आघाडी असल्याने काँग्रेसनेदेखील यामध्ये उडी घेतली आहे. स्थायी समितीमध्ये शिवसेनेला साथ दिल्याने परिवहनमध्ये संधी मिळावी, अशी अपेक्षा काँग्रेसने व्यक्त केली आहे. दुसरीकडे राष्टÑवादीनेदेखील अधिकचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेची डोकेदुखी आधीच वाढली आहे. स्थायीची परतफेड करण्यासाठी काँग्रेसला साथ देणे शिवसेनेला क्रमप्राप्त झाले आहे.शिवाय राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने आता त्यानुसार प्रत्येक निवडणुकीत या तीन पक्षांच्या सदस्यांना स्थान मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार काँग्रेसने आपला दावा मजबुत केला आहे.आता शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेसकडून भाजपला रोखण्यासाठी परिवहनमध्ये प्रयत्न सुरू झाले आहे. त्यानुसार भाजपने दोन अर्ज दाखल केले असले तरी शिवसेनेचे मत आपल्या उमेदवाराबरोबर राष्टÑवादीच्या उमेदवाराला मिळाले तर पक्षाचा एकच सदस्य परिवहनमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेही निवडणूक गाजणार आहे.निवडणुकीपर्यंत बाहेरगावी जाण्यास मनाईएकीकडे शिवसेनेपुढील डोकेदुखी वाढली असतांना भाजपालाही आपले दोन सदस्य परिवहनमध्ये व्यवस्थितरित्या जाण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यानुसार या निवडणुकीच्या वेळेस सभागृहात पक्षाचा एकही नगरसेवक गैरहजर राहणे भाजपला झेपणारे नाही.असे झाल्यास दोनपैकी एकाला फटका बसण्याची शक्यता असल्याने पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी मंगळवारी सर्व नगरसेवकांना व्हिप बजावला आहे. त्यानुसार या निवडणुकीपर्यंत कोणीही न सांगता बाहेरगावी जाऊ नये, दिलेल्या सुचनांचे पालन व्हावे, तसेच जे उमेदवार दिले आहेत, त्यांनाच मतदान करावे असेही या व्हीपमध्ये सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका