व्यापाऱ्यांच्या वाहनांनी अडवला रस्ता

By Admin | Updated: September 9, 2016 02:50 IST2016-09-09T02:50:17+5:302016-09-09T02:50:17+5:30

शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले शोरूम आणि मॉलमधील व्यापारी, ग्राहकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आहे. मात्र, असे असूनही रस्त्यावरच वाहने उभी केली जात

Trafficking vehicles blocked road | व्यापाऱ्यांच्या वाहनांनी अडवला रस्ता

व्यापाऱ्यांच्या वाहनांनी अडवला रस्ता

भिवंडी : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले शोरूम आणि मॉलमधील व्यापारी, ग्राहकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आहे. मात्र, असे असूनही रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने येथे वाहतूककोंडी होत आहे.
अंजूरफाटा ते नदीनाका, वंजारपाटीनाका ते चाविंद्रा, कल्याणनाका ते बायपास रांजनोली व अंजूरफाटा ते नारपोली हे मुख्य रस्ते आहेत. या मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहनांचे शोरूम व मॉल आहेत. त्यापैकी काही शोरूममालकांची स्वत:ची पार्किंग व्यवस्था नसल्याने ते पदपथ किंवा रस्त्यावर गाड्या उभ्या करतात. त्यामुळे नेहमी या मार्गावर वाहनांची कोंडी होते. महापालिकेशेजारी कोणार्क आर्केड ही व्यावसायिक इमारत बांधली आहे. त्यामधील कार्यालयांच्या मालकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था इमारतीत केली आहे. सध्या इमारतीत राजकीय पक्षांची कार्यालये झाली आहेत. त्यामुळे कार्यकर्ते रोज आपली वाहने घेऊन कार्यालयात येतात व या इमारतीसमोेर वाहने लावतात.
या इमारतीसमोर एसटी व रिक्षांचा थांबा आहे. त्या ठिकाणी वाहने उभी केली जात असल्याने बस, रिक्षा उभ्या करण्यासाठी जागा मिळत नाही. येथे वाहने अडकल्यास जकातनाका ते एसटी स्थानकादरम्यान नेहमी वाहतूककोंडी होते. त्यामुळे मॉल व शोरूमसमोेर उभ्या वाहनांवर कडक कारवाईची नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Trafficking vehicles blocked road