वाहतूक पोलिसाला मारहाण: युवक, तरुणी अटकेत

By Admin | Updated: October 28, 2015 23:22 IST2015-10-28T23:22:17+5:302015-10-28T23:22:17+5:30

विटाव्यातील अक्षय पाटील आणि कळव्यातील स्रेहा गौरी हे दोघे एकाच मोटारसायकलवरून मंगळवारी रात्री १० वा.च्या सुमारास घोडबंदर रोडमार्गे जात होते.

Traffic Police Strike: Youth, Girlfriend Detained | वाहतूक पोलिसाला मारहाण: युवक, तरुणी अटकेत

वाहतूक पोलिसाला मारहाण: युवक, तरुणी अटकेत

ठाणे : विटाव्यातील अक्षय पाटील आणि कळव्यातील स्रेहा गौरी हे दोघे एकाच मोटारसायकलवरून मंगळवारी रात्री १० वा.च्या सुमारास घोडबंदर रोडमार्गे जात होते.
याचदरम्यान, त्यांनी तत्त्वज्ञान सिग्नल तोडल्याने वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कोळी यांनी त्यांना थांबवून त्यांच्याकडे लायसन्सची मागणी केली. त्या वेळी त्या दोघांनी कोळींना शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातील वॉकीटॉकी फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अक्षयला रात्रीच अटक केली, तर स्रेहाला बुधवारी सकाळी अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.एम. चव्हाण करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Traffic Police Strike: Youth, Girlfriend Detained