शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्ट ठेकेदाराशी आदित्य ठाकरेंचे गुफ्तगू; शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 07:00 IST

उपवन येथील संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर कलादिर्ग्दशकाची हजेरी

ठाणे : ठाण्यात थीम पार्क आणि बॉलीवूड पार्कमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सत्ताधारी शिवसेनेनेसह विरोधकांनी उघड केले. त्यानंतर प्रशासनानेदेखील याची चौकशी करून त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर थिम पार्कची बिले वसूल करण्याबरोबरच बॉलीवूड पार्कचे काम थांबविण्याचे आदेशही महासभेत दिले आहेत. तसेच चित्रपटसृष्टीतील त्या प्रख्यात कलादिर्ग्दशकावरदेखील कारवाई व्हावी असेही सांगितले आहे. परंतु, आता याच कलादिर्ग्दशकाने उपवन येथील संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर हजेरी लावून शिवसेनेचे युवानेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंशी गुफ्तगू केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यामुळे या घोटाळ्याचे काय झाले, असा सवाल करण्यात येत आहे.ठाण्यातील घोडबंदर भागात थीम पार्कमध्ये उभारलेले पुतळे आणि इतर कलाविष्कारांवर १६ कोटींचा खर्च केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनीच सुरुवातीला याला आक्षेप घेतला होता. तसेच बॉलीवूड पार्कसाठी २० कोटींचा खर्च करण्यात येणार होता. परंतु, अर्धवट काम असताना पालिकेने संबंधित ठेकेदाराला ८ कोटींचे बिलही अदा केले होते. यावरूनदेखील वादंग होऊन प्रसिद्ध कलादिग्दर्शकावरही आक्षेप घेतला होता. संबंधित ठेकेदाराकडून हा खर्च वसूल करावा अशी मागणीही यावेळी झाली होती. परंतु, शिवसेनेची सत्ता असतानाही पालिका स्तरावर लावलेल्या समितीच्या चौकशीचे काय झाले याचे उत्तर अद्यापही मिळू शकलेले नाही.शिवसेनेचे पदाधिकारी ठेकेदाराच्या दिमतीलासोमवारी रात्री संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून हाच तथाकथीत ठेकेदार उपस्थित होता. शिवाय ज्या नगरसेवक आमदारांनी संबधींत ठेकेदाराच्या कामावर आक्षेप घेतला होता, तेदेखील याच व्यासपीठावर त्याच्या दिमतीला उपस्थित असल्याचे दिसले. त्यामुळे आता या ठेकेदाराला पाठिशी घालण्याचा शिवसेनेकडून प्रयत्न तर केला जात नाही ना? असा सवाल या निमित्ताने करण्यात येत आहे.मनसेचे आदित्य ठाकरेंना आव्हानआदित्य ठाकरे तुम्ही खरे कलाप्रेमी आहात म्हणून ठाण्यात आलात. मात्र, खरी आर्ट तुम्हाला पाहायची असेल तर तुमच्याच नगरसेवक, आमदारांच्या कृपेने झालेले ३६ कोटी रुपये खर्च करून बांधलेले थीम पार्क आणि बॉलीवूड पार्कला एकदा भेट द्याच, असे आव्हान मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केले आहे. या भेटीतून ठाण्यात नक्की काय ‘करून दाखवले’ आहे याचा अंदाज तुम्हाला येईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.पालिकेसह राज्यातही शिवसेना सत्तेत असताना दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याशी जवळीक साधण्याच्या प्रकारावर पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे