शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; आज होणार नागरिकांचे हाल

By admin | Updated: January 26, 2016 02:00 IST

ठाणे परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २६ जानेवारीला सार्वजनिक सुटीची हाक दिली आहे. परंतु, जे कर्मचारी या सुटीत सहभागी होतील

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २६ जानेवारीला सार्वजनिक सुटीची हाक दिली आहे. परंतु, जे कर्मचारी या सुटीत सहभागी होतील, त्यांच्यावर मेसाखाली कारवाई करण्याचा इशारा राज्य शासनाच्या वतीने ठाणे महापालिकेने कर्मचाऱ्यांना दिला आहे. मात्र, राज्य शासनानेच जाहीर केलेली सुटी आम्ही घेत असल्याने कारवाई झाली तरी बेहत्तर, आम्ही आमची भूमिका बदलणार नसल्याचे प्रत्युत्तर कर्मचाऱ्यांनी दिल्याने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ठाणेकरांचे मात्र हाल होणार आहेत. आपल्या विविध भत्त्यांपोटी प्रशासनाकडून १२५ कोटींची थकबाकी मिळावी, ६१३ कामगारांना परिवहन सेवेत कायम करावे, सर्व कामगारांना महापालिकेत समाविष्ट करावे, आदी मागण्यांसाठी कामगारांना पालिका प्रशासन, महापौर आणि कामगार आयुक्तांकडेही चर्चा झाली. परंतु, या चर्चेतून कोणत्याही प्रकारचे समाधान न झाल्याने २६ जानेवारीला त्यांनी सार्वजनिक सुटीची हाक दिली आहे. विशेष म्हणजे तरीही प्रशासनाने लक्ष दिले नाही तर मात्र त्याच दिवसापासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात महापौर संजय मोरे यांनी कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत आदेश दिले होते. परंतु, तरीदेखील यावर तोडगा न निघाल्याने अखेर त्यांनी ही सुटीची हाक दिली आहे. (प्रतिनिधी)