ठाण्यात उड्डाणपुलावर तीन वाहनांचा अपघात : रिक्षातील महिलेसह दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:46 IST2021-09-15T04:46:09+5:302021-09-15T04:46:09+5:30

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गाच्या नाशिक बाजूकडील उड्डाणपुलावर मंगळवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन रिक्षाचे मोठ्या ...

Three vehicles crash on Thane flyover: Two injured in rickshaw accident | ठाण्यात उड्डाणपुलावर तीन वाहनांचा अपघात : रिक्षातील महिलेसह दोघे जखमी

ठाण्यात उड्डाणपुलावर तीन वाहनांचा अपघात : रिक्षातील महिलेसह दोघे जखमी

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गाच्या नाशिक बाजूकडील उड्डाणपुलावर मंगळवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने, या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी रिक्षातील एका महिलेसह दोघे प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

विजय गायकवाड हा ट्रेलर घेऊन नाशिकच्या दिशेने ठाणे नाशिक पूर्व द्रुतगती मार्गावरील कापूरबावडी उड्डाणपुलावरुन जात होता. त्याच मार्गावरून अहतेशाम सय्यद यांची रिक्षा जात होती. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून राजेश मिश्रा हाही ट्रेलर घेऊन आला. ही सर्व वाहने एकामागून एक नाशिकच्या दिशेने जात असताना माजीवडा उड्डाणपुलावर एकमेकांना धडकली. यामध्ये रिक्षातून प्रवास करणारे दानिश शाह (३८) आणि तरनुमून शाह (३०) हे दोघे प्रवासी जखमी झाले. दानिश यांच्या दोन्ही पायांना आणि डोक्याला तर तरनुमून या महिलेच्या पाठीला मार लागला. दोघांनाही तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलासह कापूरबावडी आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रिक्षातील जखमी प्रवाशांना बाहेर काढले. दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करुन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

.........

Web Title: Three vehicles crash on Thane flyover: Two injured in rickshaw accident