शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

बोरीवलीत मगरींची तस्करी करणारे तिघे अटके त; वनविभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:50 PM

दुर्मिळ वन्य प्राण्याची तस्करी करणा-या बसचालक मोहंमद अब्दुल रहीम हाफिज (३३) याच्यासह खुददुस लातफ बैग (३८) आणि शिवाजी बलाया (२८) या तिघांना ठाणे वनविभागाने मुंबईतील बोरीवली भागातून सोमवारी अटक केली.

ठाणे : खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बसच्या डिकीतून चक्क मगर या दुर्मिळ वन्य प्राण्याची तस्करी करणा-या बसचालक मोहंमद अब्दुल रहीम हाफिज (३३) याच्यासह खुददुस लातफ बैग (३८) आणि शिवाजी बलाया (२८) या तिघांना ठाणे वनविभागाने मुंबईतील बोरीवली भागातून सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून दोन जिवंत मगरींची सुखरुपरित्या सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.बोरीवली येथे जाणाºया एका खासगी प्रवासी बसमधून मगरींच्या पिलांची तस्करी होत असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. त्या आधारे १६ सप्टेंबर रोजी बोरीवली येथे एका संशयित बसची ठाण्याचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक गिरजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनपाल पवार, परदेशी आणि मोरे आदींच्या पथकाने तपासणी केली. तेंव्हा बसच्या सामान ठेवण्याच्या डिकीत एका बॉक्समध्ये डांबून ठेवलेल्या दोन जिवंत मगरी आढळून आल्या. याप्रकरणी बसचालक हाफिज याच्यासह तिघांना वनविभागाने अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मगरींची तस्करी करीत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यांच्या ताब्यातून दोन मगरींची सुटका केली आहे. त्यांनी त्या कोणाकडून आणल्या त्याची ते कोणाला विक्री करणार होते, याची चौकशी सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. ठाण्याचे वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे अधिक तपास करीत आहेत.