कळव्यात अतिक्रमण हटविणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर दगडफेक: दोन वनपालांसह तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 11:59 PM2020-05-28T23:59:19+5:302020-05-29T00:03:14+5:30

कळव्यातील वनजमिनींवर होणारे अतिक्रमण रोखणा-या दोन वनपालांसह तिघांवर अतिक्रमणधारकांनी दगडफेक केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेत तिघे वनकर्मचारी जखमी झाले असून तिघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Three injured, including two forest rangers at Kalwa, Thane | कळव्यात अतिक्रमण हटविणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर दगडफेक: दोन वनपालांसह तिघे जखमी

गस्तीदरम्यान अतिक्रमणाचा प्रकार उघड

Next
ठळक मुद्दे कळवा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखलगस्तीदरम्यान अतिक्रमणाचा प्रकार उघड

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कळव्यातील पारसिकनगर, घोलाईनगर येथील वनजमिनीवरील अतिक्रमणाला विरोध करणाºया वनपाल समीर इनामदार आणि अर्जून निचित यांच्यासह तिघेजण दगडफेकीत जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर संचारबंदी असल्यामुळे वनजमिनीवर कुठेही अतिक्रमण होऊ नये यासाठी ठाणेवनविभागाने प्रत्येक क्षेत्रात एकदिवसाआठ गस्तीचे नियोजन केले आहे. २८ मे रोजी दुपारी कळवा येथील वनपाल समीर इनामदार, महापेचे (नवी मुंबई) वनपाल अर्जून निचिते आणि वनमजूर सचिन म्हात्रे यांचे पथक दुपारी १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास गस्त घालीत होते. त्यावेळी काही भटके रहिवाशी या भागात बांधकाम करीत असल्याची बाब या पथकाच्या निदर्शनास आली. त्यांनी या अतिक्रमणाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा बारकू पवार या अतिक्रमण धारकासह तिघांनी निचिते यांच्यासह तिघांवरही दगडफेक करीत हल्ला केला. यात निचिते यांच्या डोक्याला तर इनामदार यांच्या हाताला जबर मार लागला. वनमजूर म्हात्रे हे देखिल या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या तिघांवरही कळव्यातील मनिषा नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी कळवा रुग्णालयात बारकू पवार याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे अतिक्रमण थांबविण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.

 

Web Title:  Three injured, including two forest rangers at Kalwa, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.