शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील वागळे इस्टेट येथे चोरी करणाऱ्या दोघा चोरटयांसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 18:28 IST

कंपनीतून पाच माइल्ड स्टीलच्या प्लेटा चोरणाºया कैलास चुडासमा (२५, रा. वागळे इस्टेट, ठाणे) आणि विलास वाघमारे (३३, रा. वागळे इस्टेट) या चोरटयांसह चोरीचा माल विकत घेणारा आलमगीर शेख (२५, रा. वागळे इस्टेट) या तिघांना वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून ३० किलो वजनाच्या दोन माईल्ड स्टील प्लेटा हस्तगत केल्या आहेत.

ठळक मुद्देचोरीचा माल घेणाºयालाही घेतले ताब्यात वागळे इस्टेट पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वागळे इस्टेट, जय भवानी नगरातील इलेक्ट्रो फॅब, हॉइस्ट अ‍ॅन्ड कॅन्सस मॅन्युफ्रॅक्चर कंपनीतून पाच माइल्ड स्टीलच्या प्लेटा चोरणाºया कैलास चुडासमा (२५, रा. वागळे इस्टेट, ठाणे) आणि विलास वाघमारे (३३, रा. वागळे इस्टेट) या चोरटयांसह चोरीचा माल विकत घेणारा आलमगीर शेख (२५, रा. वागळे इस्टेट) या तिघांना वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांना २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.वागळे इस्टेट, श्रीनगर येथे राहणारे सिरील डिसूझा (५६) यांच्या मालकीच्या इलेक्ट्रो फॅब, हॉइस्ट अ‍ॅन्ड कॅन्सस मॅन्युफ्रॅक्चर कंपनीतून १९ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरटयांनी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केला. त्यांनी फॅब्रिकेशन शॉपमध्ये मशिनिंग करुन ठेवलेल्या सुमारे ११० किलो वजनाच्या पाच माइल्ड स्टील प्लेटांची चोरी केली होती. हे दोघेही चोरटे वागळे इस्टेट परिसरातील असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बी. एस. निकुंभ यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली निकुंभ यांच्यासह जमादार ए. टी. पवार, पोलीस नाईक एस. ए. मोरे, टी. एम. खोत, एस. बी. थोरात, आर. व्ही. जाधव, आर. सी. शेलार आणि डी. पी. बरले आदींच्या पथकाने कैलास आणि विलास या दोघांना १९ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वागळे इस्टेट येथील त्यांच्या घरातून अटक केली. तर चोरीचा माल खरेदी करणारा आलमगीर या भंगार विक्रेत्यालाही २० नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून ३० किलो वजनाच्या दोन माईल्ड स्टील प्लेटा हस्तगत केल्या आहेत. त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? तसेच चोरीचा माल हस्तगत करणे बाकी असल्यामुळे तिघांनाही पोलीस कोठडी देण्याची मागणी वागळे इस्टेट पोलिसांनी केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी