शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुकीत ९ नगरसेवक वाढणार

By admin | Updated: November 4, 2014 23:16 IST

: नवीन जनगणनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या १२ लाख ४६ हजाराच्या घरात पोहोचली आहे.

कल्याण: नवीन जनगणनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या १२ लाख ४६ हजाराच्या घरात पोहोचली आहे. या लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभागांच्या रचनांमध्येही बदल होणार असून पॅनल पध्दतीमुळे ५८ प्रभाग यापुढे असणार आहेत. सध्या असलेल्या १०७ नगरसेवकांमध्ये अधिक ९ नगरसेवकांची भर पडणार असून त्यामुळे महापालिकेच्या आॅक्टोबर २०१५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ११६ नगरसेवक निवडुन येणार आहेत. केडीएमसीची पहिली सार्वत्रिक निवडणुक १९९५ साली झाली यात १९९१ च्या जनगणनेनुसार ९६ प्रभागांमध्ये निवडणूक घेण्यात आली. तर २००१ च्या लोकसंख्येनुसार पुढे प्रभाग वाढुन १०७ नगरसेवक निवडुन आले. तर सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार महापालिका क्षेत्राची लोकसंख्या आता १२ लाख ४६ हजार ३८१ इतकी आहे.१२ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असेल त्याठिकाणी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ११५ इतकी असेल तसेच १२ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ४० हजार इतक्या अधिक लोकसंख्येला एक अतिरिक्त पालिका सदस्य अशी महाराष्ट्र महापालिका अधिनियम ५ मध्ये तरतूद आहे. यानुसार तसेच शासनाने २०११ मध्ये पॅनल पध्दतीच्या केलेल्या नियमानुसार केडीएमसीची आगामी निवडणूक पार पडणार आहे. पॅनल प्रमाणे ५८ प्रभाग राहणार असल्याने प्रत्येक प्रभागातुन दोन असे ११६ नगरसेवक निवडले जातील. यात एक महिला असणार आहे. पॅनल मुळे मतदाराला दोघांना मतदान करण्याचा अधिकार राहणार आहे. ५० टकके आरक्षणामुळे ११६ नगरसेवकांपैकी ५८ महिला नगरसेविका असणार आहेत अशी माहीती केडीएमसीचे माजी सचिव तथा निवडणूक तज्ज्ञ चंद्रकांत माने यांनी लोकमतशी बोलताना दिली. नव्या पॅनल पध्दतीनुसार ११६ नगरसेवक निवडून येणार असले तरी स्वीकृत सदस्यांची संख्या ५ इतकीच राहणार आहे. (प्रतिनिधी)