शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात लाखांची चोरी करणारे अटकेत

By admin | Updated: December 30, 2016 01:17 IST

कोपरीतील एका सराफाच्या दुकानातून सात लाख ५३ हजारांच्या सोने-चांदीच्या ऐवजाची चोरी करून, राजस्थानमध्ये पसार झालेल्या पाच चोरट्यांच्या कोपरी पोलिसांनी मुसक्या

ठाणे : कोपरीतील एका सराफाच्या दुकानातून सात लाख ५३ हजारांच्या सोने-चांदीच्या ऐवजाची चोरी करून, राजस्थानमध्ये पसार झालेल्या पाच चोरट्यांच्या कोपरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे तीन लाखांचा ऐवजही हस्तगत केला आहे.कोपरीतील धरमचंद जैन यांच्या सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान १२ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान फोडून, त्यांनी सात लाख ५३ हजारांच्या ऐवजाची चोरी केली होती. या प्रकरणी १३ नोव्हेंबर रोजी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यातील चोरटे राजस्थानातील उदयपूर भागात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी. कोर्डे यांना मिळाली होती. तिच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक राम गोपाळ यांच्या पथकाने कमलेश आणि भवानीशंकर यांना उदयपूरच्या गावगुडा भागातून अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी या चोरीची कबुली दिली. त्यानंतर, हळदीघाट या अत्यंत दुर्गम भागातील कमलेश याच्या घरातून ७९ हजार ६९२ रुपयांची दोन हजार ६५६ ग्रॅम वजनाची चांदी आणि ५५.०६ ग्रॅम वजनाचे ५५ हजार ६० रुपयांचे सोन्याचे दागिने, तर भवानीशंकर याच्याकडून ५८ हजार ७७९ रुपयांचे दागिने हस्तगत केले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीनंतर त्यांचे साथीदार भवानीसिंग आणि भैरूसिंग यांनाही राजसंबंध येथून अटक केली. त्यांच्याकडूनही ९० हजार ८६५ रुपयांचे सोनेचांदीचे दागिने हस्तगत केले. त्यांच्या पाचव्या साथीदारालाही २९ डिसेंबर रोजी अटक केल्याची माहिती कोर्डे यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणात सहा किलो ९११.२ ग्रॅम वजनाची चांदी आणि आठ तोळे सोन्याचे दागिने, असा सुमारे तीन लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. यातील आणखी दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)